JOIN US
मराठी बातम्या / देश / रुग्णालयात चक्क बकरी आली; कारण ऐकून येईल डोळ्यात पाणी

रुग्णालयात चक्क बकरी आली; कारण ऐकून येईल डोळ्यात पाणी

रस्त्यात एखादा जखमी प्राणी दिसला की आपण नाकावर रुमाल ठेवून आपली वाट धरतो. असे खूप कमीजण असतात जे त्या प्राण्यावर उपचार व्हावे यासाठी प्रयत्न करतात. अशातच…

जाहिरात

बकरीची तळमळ पाहून डॉक्टरही भारावले. काही रुग्ण हसू लागले.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गौरव सिंह, प्रतिनिधी भोजपूर, 17 जुलै : पाळीव प्राण्यांना एकदा जीव लावला की त्यांच्यापासून दूर होणं किंवा त्यांना आपल्यापासून दूर करणं फार अवघड होतं. आपण त्यांना आपल्या बाळासारखं सांभाळतो आणि तेदेखील आपल्यावर प्रेम करतात. बिहारच्या आरा जिल्ह्यात असाच एक भावूक प्रसंग घडला. कुत्रा चावल्यामुळे मालक त्याच्या बकरीला चक्क माणसांच्या रुग्णालयात घेऊन आला आणि तिच्यावर उपचार करा, असं म्हणून डॉक्टरांच्या हाता-पाया पडू लागला. कुत्रा जितका गोंडस आणि प्रामाणिक असतो तितकाच त्याचा रागही भयंकर असतो. कुत्रा चावल्यावर पोटात अनेक इंजेक्शन घ्यावे लागतात, हे आपणही लहानपणापासून ऐकलं असेल. त्यामुळे पिसाळलेल्या कुत्र्यांपासून आपण चार हात लांब राहणं पसंत करतो. बिहारच्या धनपुरा गावचे रहिवासी सजिंदर यांच्या बकरीला कुत्रा चावल्यामुळे ते अक्षरश: रडकुंडीला आले आणि तिला घेऊन ताबडतोब रुग्णालयात दाखल झाले.

आरा सदर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाबाहेर जखमी बकरी पाहून डॉक्टर आणि कर्मचारीही हादरले. मालक डॉक्टरांकडे तिच्यावर उपचार करण्यासाठी गयावया करू लागला. हा प्रकार पाहून इतर रुग्ण हसू लागले, तर काहीजणांना सजिंदर यांची दया आली, बकरीवरील त्यांचं प्रेम पाहून कुतूहल वाटलं. लग्न जुळत नाहीये? श्रावणात ‘हा’ अभिषेक करा आणि चमत्कार पाहा दरम्यान, रस्त्यात एखादा जखमी प्राणी दिसला की आपण नाकावर रुमाल ठेवून आपली वाट धरतो. असे खूप कमीजण असतात जे त्या प्राण्यावर उपचार व्हावे यासाठी प्रयत्न करतात. अशातच सजिंदर यांची बकरीसाठीची तळमळ पाहून डॉक्टरही भारावले. डॉक्टरांनी त्यांना या रुग्णालयात केवळ माणसांवर उपचार होतात, प्राण्यांसाठी वेगळे दवाखाने असतात, असं व्यवस्थित समजावलं आणि बकरीला शिवगंज येथील मवेशी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर हतबल होऊन सजिंदर मवेशी रुग्णालयात जायला निघाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या