जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / लग्न जुळत नाहीये? श्रावणात 'हा' अभिषेक करा आणि चमत्कार पाहा

लग्न जुळत नाहीये? श्रावणात 'हा' अभिषेक करा आणि चमत्कार पाहा

महादेवांना प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर विविध अभिषेक केले जातात.

महादेवांना प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर विविध अभिषेक केले जातात.

तुमचं लग्न जुळत नाही? श्रावण महिन्यात ‘हा’ उपाय केला तर अपेक्षित फळ मिळू शकतं

  • -MIN READ Local18 Karauli,Rajasthan
  • Last Updated :

मोहित शर्मा, प्रतिनिधी करौली, 15 जुलै : येत्या 18 जुलैपासून अधिक श्रावण मास सुरू होतोय. त्यामुळे बाजारपेठेत विविध भाज्या आणि फळांची आवक वाढल्याचं पाहायला मिळतंय. श्रावणात भाविक मांसाहार टाळतात. त्याचबरोबर श्रावण महिना महादेवांना समर्पित असल्याने या काळात त्यांची विशेष पूजा केली जाते. त्यांना प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर विविध अभिषेक केले जातात. महादेवांना काही पदार्थ विशेष प्रिय असतात. या पदार्थांचा त्यांना अभिषेक केल्यास ते प्रसन्न होतात असं मानलं जातं. राजस्थानच्या करौली जिल्ह्यातील ज्योतिषी मनीष उपाध्याय यांनी येत्या श्रावणात महादेवांना काही खास पदार्थांचा अभिषेक केल्यास ते प्रसन्न होतील, असं सांगितलं आहे. हे पदार्थ कोणते पाहूया.

News18लोकमत
News18लोकमत

दही, दूध, तुपाचा अभिषेक : श्लोक म्हणत महादेवांना दूध अर्पण केल्यास पुत्र प्राप्ती होते. दही अर्पण केल्यास घरात ऐश्वर्य येतं आणि तुपाचा अभिषेक केल्यास शुभफळ प्राप्त होतं. यंदा 2 दिवस साजरा होणार रक्षाबंधन? नक्की 30 की 31? जाणून घ्या मुहूर्त दुर्व्याचा अभिषेक : ज्योतिषी मनीष उपाध्याय सांगतात की, श्रावण महिन्यात जो भक्त महादेवांना पाण्यात ठेवलेल्या दुर्व्याचा अभिषेक करतो, तो रोगराईपासून मुक्त होतो. डाळिंबाचा अभिषेक : लग्न जुळण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात महादेवांना डाळिंबाच्या रसाचा अभिषेक करावा. असं केल्यास विवाह योग निर्माण होतो. पंचामृताचा अभिषेक : श्रावण महिन्यात महादेवांना पंचामृत म्हणजेच दूध, दही, तूप, मध आणि साखर हे पाच पदार्थ मिसळून अभिषेक केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. नारळपाण्याचा अभिषेक : ज्योतिषी मनीष उपाध्याय सांगतात की, महादेवांना कच्च्या नारळातील पाण्याचा किंवा मोहरीच्या तेलाचा अभिषेक केल्यास आपल्या मार्गातील सर्व अडथळे आणि शत्रू आपोआप दूर होतात. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात