JOIN US
मराठी बातम्या / देश / बापरे! तब्बल 5 हजार विषारी साप पकडलेत; तरुणाचं धाडस पाहून व्हाल हैराण

बापरे! तब्बल 5 हजार विषारी साप पकडलेत; तरुणाचं धाडस पाहून व्हाल हैराण

आपण सर्पमित्र साप पकडतात हे अगोदरसुद्धा ऐकलंय. मात्र हा सामान्य तरुण अगदी आवडीने साप पडकतो. लोक त्याला जणू सापांचा मित्र म्हणतात, एवढ्या हळुवारपणे तो साप हातळतो.

जाहिरात

'फण्याला हात लावला की साप डसतो. त्यामुळे त्याला कधीही शेपटीच्या भागाकडून पकडायचं', असं विक्रम सांगतो.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सनंदन उपाध्याय, प्रतिनिधी बलिया, 13 जुलै : साप दिसला की आपल्याला अगदी थरकाप भरतो. जीव मुठीत धरून आपण पळत सुटतो. कधीकधी सापाला मारण्याचं धाडस करतो. अनेकांना तर सापाचं चित्रही पाहवत नाही. एखादी दोरी जरी अंगावर पडली तरी काळजाचा ठोका चुकतो. परंतु तुम्हाला माहितीये, आपण जेवढे सापाला घाबरतो तेवढाच तोदेखील आपल्याला घाबरतो. या भीतीपोटीच दोघं एकमेकांवर हल्ला चढवतो. हे सगळं आम्ही नाही बरं का, तर तब्बल 5 हजार विषारी साप पकडलेल्या एका धाडसी तरुणाने सांगितलंय. विक्रम वर्मा असं त्याचं नाव. उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यात राहणारा विक्रम साप पकडण्यात अगदी तरबेज आहे. आपण सर्पमित्र साप पकडतात हे अगोदरसुद्धा ऐकलंय. मात्र हा सामान्य तरुण अगदी आवडीने साप पडकतो. लोक त्याला जणू सापांचा मित्र म्हणतात, एवढ्या हळुवारपणे तो साप हातळतो. मुख्य म्हणजे एकही साप त्याला डसत नाही. कारण साप पकडण्याचं योग्य कौशल्य त्याला अवगत आहे.

विक्रम लहानपणासूनच साप पकडतो. तो हे त्याच्या मोठ्या काकांकडून शिकला. आतापर्यंत त्याने अनेक सापांना सुरक्षितरीत्या जंगलात सोडलंय. काही साप तर तो जवळ बाळगतो आणि सुनसान ठिकाण दिसताच सोडून देतो. ‘फण्याला हात लावला की साप डसतो. त्यामुळे त्याला कधीही शेपटीच्या भागाकडून पकडायचं’, असं विक्रम सांगतो. क्या बात है! चहा प्या आणि कपही खा; पठ्ठ्याने शोधली फक्कड आयडिया विक्रम म्हणतो की, ‘साप पर्यावरणाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. लोकांना त्याच्याबद्दल पुरेशी माहिती नसते, केवळ तो खतरनाक आहे एवढंच माहिती असतं. त्यामुळे ते त्याला मारतात. मात्र साप स्वतःच माणसांना घाबरतो. मी आतापर्यंत अनेक नाग पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले आहेत. साप पकडणं ही मी एक समाजसेवा मानतो. शिवाय यामुळे सापांचा जीवही वाचतो.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या