JOIN US
मराठी बातम्या / देश / Instagram साठी व्हिडिओ बनवायला गेले अन् परतलेच नाही, तलावात चौघांसोबत घडलं भयानक

Instagram साठी व्हिडिओ बनवायला गेले अन् परतलेच नाही, तलावात चौघांसोबत घडलं भयानक

तलावावर चारही मुलांसोबत भयानक घटना घडली.

जाहिरात

घटनास्थळावरील फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चूरू, 20 मार्च : अंघोळीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर लाईव्ह करताना जोहाडमध्ये बुडून चार तरुणांचा मृत्यू झाला. रविवारी घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. राजस्थानच्या चूरू जिल्ह्यातील रामसरा गावात ही घटना घडली. प्रशासनाच्या मदतीने गावकऱ्यांनी बचावकार्य सुरू केले आणि सुमारे तीन तासांच्या प्रयत्नानंतर गावकऱ्यांनी तरुणाचे मृतदेह बाहेर काढले. चार तरुणांचे मृतदेह शासकीय भरतिया रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. सोमवारी अहवाल आल्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल. डीएसपी राजेंद्र बुरडक यांनी सांगितले की, रामसरा गावातील चार तरुण तलावात आंघोळीसाठी उतरले होते. यादरम्यान 21 वर्षीय सुरेश समोरून चालत येत होता. यावेळी तो म्हणाला की, मी तलावमधूनच ओलांडून जाईल, मात्र, मध्येच पाण्यात तोल गेल्याने तो बुडू लागला. सुरेशला वाचवण्याच्या प्रयत्नात तिघे साथीदार खोल पाण्यात गेले आणि वर येऊच शकले नाहीत. चौघांचा यावेळी बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये रामसरा येथील सुरेश नायक (21), योगेश रैगर (18), लोकेश निमेल (18) आणि कबीर सिंह (18) यांचा समावेश आहे. सायंकाळी उशिरापर्यंत रामसरा येथील रहिवासी जीतू प्रजापत, उमर प्रजापत, रणजित कडवसरा, ताराचंद प्रजापत, सुभाष, ओमप्रकाश नई आणि प्यारेलाल यांनी तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर एकामागून एक या चार तरुणांचे मृतदेह बाहेर काढले. कॉल करुन तलावात अंघोळीसाठी बोलावले - घटनास्थळी उपस्थित असलेल्या मोनू या तरुणाने सांगितले की, रविवारी दुपारी लोकेशने त्याला तलावात आंघोळीसाठी बोलावले होते, मात्र त्याने आंघोळ करण्यास नकार दिला. यावर युवकाने त्याला त्याच्या अंघोळीचा व्हिडिओ लाइव्ह बनवण्यास सांगितले. त्यानंतर अचानक सुरेश बुडू लागला, मोनू घाबरला आणि त्याने तरुणाच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. माहिती मिळताच गावकरी व तरुणाचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. Dog Story : कुत्रा भूंकला म्हणून शेजाऱ्याचे नियंत्रण सुटले, लाठीने केली जोरदार पाहा VIDEO

दरम्यान, मृत्यू झालेल्या कबीर आणि योगेश यांचे वडील परदेशात राहत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. योगेश हा दोन भावांमध्ये मोठा भाऊ होता. कबीरने काही काळापूर्वीच शिक्षण सोडले होते, तो दोन भाऊ आणि एका बहिणीमध्ये सर्वात लहान होता. इतर दोन साथीदारांमध्ये लोकेश हा लोहिया कॉलेजचा विद्यार्थी होता आणि सुरेश हा ड्रायव्हर होता. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या