मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Dog Story : कुत्रा भूंकला म्हणून शेजाऱ्याचे नियंत्रण सुटले, लाठीने केली जोरदार पाहा VIDEO

Dog Story : कुत्रा भूंकला म्हणून शेजाऱ्याचे नियंत्रण सुटले, लाठीने केली जोरदार पाहा VIDEO

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

कुत्रा भुंकला म्हणून शेजाऱ्याने धक्कादायक कृत्य केले.

  • Local18
  • Last Updated :
  • Rajgarh, India

शुभम जायसवाल, प्रतिनिधी

राजगढ, 19 मार्च : राजगढ जिल्ह्यातील खिलचीपूरमध्ये प्राण्यांच्या क्रूरतेची घटना समोर आली आहे. येथे कुत्र्याच्या भुंकण्याचा राग आल्याने एका तरुणाने कुत्र्याला काठीने एवढ्या निर्दयीपणे मारहाण केली की, तो गंभीर जखमी झाल्याने तो मरणासन्न अवस्थेत पोहोचला. या घटनेनंतर संतप्त लोकांनी या तरुणाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण -

कुद्दुस हुसैन याने कुत्र्याच्या भुंकल्यावर त्याला बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी खिलचीपूर पोलिस ठाण्यातील रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. कुत्र्याने भुंकल्यावर कुद्दूसने घरातून काठी आणली आणि कुत्र्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. कुत्रा खाली पडल्यावर या निर्दयी तरुणाने त्याच्या चेहऱ्यावर काठ्यांनी हल्ला करण्यास सुरुवात केली.

कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावत आले आणि त्यांनी कुद्दुसला थांबवले. मात्र, तोपर्यंत कुत्रा मरणासन्न अवस्थेत पोहोचला होता. संतप्त लोकांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. परिसरातील नागरिकांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

" isDesktop="true" id="851992" >

खिलचीपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रभात गौर यांनी सांगितले की, सराफा बाजार दर्‍झी गली परिसरातील लोकांनी कुद्दुस हुसैन गुलाम हुसैन याने कुत्र्याने भुंकल्यावर त्यांना लाठ्या-काठ्याने मारहाण करून जखमी केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात आली होती. परिसरातील नागरिकांच्या तक्रारीवरून आरोपी कुद्दूस याच्याविरुद्ध प्राण्यांवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तरी आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, या घटनेची परिसरात चर्चा होत आहे.

First published:

Tags: Dog, Local18, Madhya pradesh