प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)
बंगळुरू, 03 मार्च : 44 वर्षांची अन्नम्मा आपल्या 14 वर्षांच्या मुलासोबत राहत होती. एक वर्षापूर्वी तिच्या नवऱ्याचा किडनी फेल झाल्याने मृत्यू झाला होता. घरात दोघंच मायलेक राहत होते. एक दिवस अन्नम्मा आपल्या खोलीत झोपूनच राहिली ती आपल्या मुलाशीही बोलत नव्हती. सुरुवातीला आई आपल्यावर नाराज आहे असं मुलाला वाटलं. पण दोन दिवसांनी त्याला जे समजलं त्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. बंगळुरूतील ही धक्कादायक घटना आहे. मायलेक आरटी नगरमधील एका घरात राहत होते. एक दिवस मुलाची आई झोपली होती, ती त्याच्याशी बोलतही नव्हती. आई आपल्यावर नाराज असेल असं समजून मुलगा घराबाहेर खेळायला गेला. जेवण्यासाठीही तो घरी आला नाही. आपल्या मित्रांच्या घरीच त्यांच्यासोबत तो जेवला. नंतर तो घरी यायचा. असं त्याने दोन दिवस केले. 24 वर्षे एकाच ताटात जेवली, झाला मृत्यू; आईच्या निधनानंतर डॉक्टर लेकाला समजलं मोठं सत्य पण दोन दिवस झाले तरी आई उठली नाही, बोलली नाही. त्यामुळे मुलालाही चिंता वाटू लागली. त्याने 28 फेब्रुवारीला आपल्या वडिलांच्या मित्रांना फोन केला. ते त्यांच्या घरी आले, त्यांनी पाहिलं तर अन्नाम्मा जग कायमचं सोडून गेली होती.
इंडिया डॉट कॉमच्या वृत्तानुसार पोलीस म्हणाले, अन्नम्माचा मृत्यू 26 फेब्रुवारीलाच झाला होता. लो शुगर आणि ब्लड प्रेशरमुळे झोपेत तिचा जीव गेला. पण मुलाला वाटलं आई झोपली आहे. आईचा मृत्यू झाला आहे हे त्याला माहितीच नव्हतं. आपल्या आईच्या मृतदेहासोबतच तो दोन दिवस या घरात होता. 40 वर्षांत एकदाही रोमान्स नाही; 57 व्या वयात महिलेने पहिल्यांदाच शारीरिक संबंध ठेवले आणि… दरम्यान पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.