मराठी बातम्या /बातम्या /Viral /24 वर्षे एकाच ताटात जेवली, झाला मृत्यू; आईच्या निधनानंतर डॉक्टर लेकाला समजलं मोठं सत्य

24 वर्षे एकाच ताटात जेवली, झाला मृत्यू; आईच्या निधनानंतर डॉक्टर लेकाला समजलं मोठं सत्य

एका डॉक्टर मुलाला आपल्या आईच्या निधनानंतर असं सत्य समजलं की तो भावुक झाला आणि सोशल मीडियावर व्यक्त होण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही.

एका डॉक्टर मुलाला आपल्या आईच्या निधनानंतर असं सत्य समजलं की तो भावुक झाला आणि सोशल मीडियावर व्यक्त होण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही.

एका डॉक्टर मुलाला आपल्या आईच्या निधनानंतर असं सत्य समजलं की तो भावुक झाला आणि सोशल मीडियावर व्यक्त होण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Chennai, India

चेन्नई, 20 जानेवारी : सोशल मीडियावर बरेच फोटो, व्हिडीओ, पोस्ट व्हायरल होत असतात. अशाच एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. एका साध्या ताटाचा हा फोटो आहे. स्टीलचं ताट. ज्या व्यक्तीने ताटाचा हा फोटो पोस्ट केला आहे. त्याने सांगितल्यानुसार हे त्याच्या आईचं ताट आहे. या एकाच ताटात ती जेवत होती. आता तिचा मृत्यू झाला आहे. पण तिच्या मृत्यूनंतर डॉक्टर असलेल्या तिच्या या लेकाला मोठं सत्य समजलं आहे. ज्याबाबत तो सोशल मीडियावर व्यक्त झाला आहे.

आईच्या मृत्यूनंतर लेकाला ती जेवत असलेल्या ताटाबाबत असं काही माहिती झालं की तो खूप भावुक झाला. त्याची ही पोस्ट वाचल्यानंतर तुम्हालाही रडू आवडणार नाही. @vsb_dentist ट्विटर अकाऊंटवर ही भावुक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्या व्यक्तीचं हे ट्विटर अकाऊंट आहे त्याचं नाव विक्रम बुद्धानसन असं आहे. त्याने ट्विटर प्रोफाईल लिंकमध्ये दिलेल्या माहितीनुसार तो एक डेन्टिस्ट आहे, जो चेन्नईत राहतो.

हे वाचा - ट्रॅफिकमध्ये अडकली नवरीबाई; मुहूर्ताआधी मंडपात पोहोचण्यासाठी असं काही केलं की VIDEO तुफान VIRAL

ट्विटमध्ये त्याने सांगितलं, "हे माझ्या आईचं ताट. गेल्या 2 दशकांपासून ती यातच जेवत होती. हे एक छोटंसं ताट आहे. तिच्या या ताटात जेवण्याची परवानगी फक्त मला आणि माझ्या छोट्या भाचीलाच आहे. आईच्यानिधनानंतर मला माझ्या बहिणीकडून समजलं की हे तेच ताट आहे जे मी बक्षीस म्हणून जिंकलं होतं"

"1999 साली सातवीत असताना मला हे बक्षीस मिळालं होतं. गेली 24 वर्षे ती मी जिंकलेल्या याच ताटात जेवत होती आणि तिने मला हे कधी सांगितलंही नाही, असं म्हणत आईच्या आठवणीने त्याला गहिवरून आलं.

हे वाचा - 'महिलांना जितकी जास्त मुलं, तितका जास्त पगार, 3 लाख रुपयांचं अनुदान', मुख्यमंत्र्यांची अजब घोषणा

आपली आई या एकाच ताटात का जेवत होती, आपल्याशिवाय दुसऱ्या कुणाला ते ताट का देत नव्हती. यामागील खरं कारण तिच्या मृत्यूनंतर लेकाला समजलं. तो इमोशनल झाला आणि स्वतःला रोखू शकला नाही.

ही पोस्ट पाहणारा, वाचणारा प्रत्येक जण भावुक झाला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

First published:

Tags: Mother, Son, Viral