JOIN US
मराठी बातम्या / देश / दार उघडताच घर मालकाला बसला धक्का, समोर बसला होता....

दार उघडताच घर मालकाला बसला धक्का, समोर बसला होता....

भीलवाडा जिल्ह्यातील बदनोर या क्षेत्रातील एका घरात 10 फूट लांब अजगर घुसला होता.

जाहिरात

दार उघडताच घर मालकाला बसला धक्का, समोर बसला होता....

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भीलवाडा, 29 जुलै : सध्या पावसाळा ऋतू सुरु असल्याने घरात तसेच वस्त्यांमधून साप, अजगर बाहेर पडण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.  भीलवाडा जिल्ह्यातील बदनोर या क्षेत्रातील एका घरात 10 फूट लांब अजगर घुसला होता. अजगराला पाहून घरातील सदस्यांना धक्का बसला. मग गावकऱ्यांनी सर्प मित्राला बोलावून अजगराला पकडले आणि त्यानंतर सुखरूप जंगलात सोडले. बदनौरच्या बेवार मार्गावरील श्यामसुंदर शर्मा यांच्या घरात अजगर घुसला होता. श्यामसुंदर शर्मा यांनी त्यांच्या घराचा दरवाजा उघडला असता दरवाजाजवळ घराच्या व्हरांड्यात 10 फूट लांबीचा अजगर बसला होता. यानंतर सर्प मित्र रशीद मोहम्मद याला बोलावण्यात आले आणि अजगराला सुखरूप पकडून जंगलात सोडण्यात आले. भोपळ्याच्या लागवडीतून शेतकरी महिन्याला कमावतोय 60 हजार, जाणून घ्या किती येतो खर्च सर्प मित्र रशीद मोहम्मदने सांगितले की, अजगराने रात्री प्राण्याची शिकार केली होती आणि मग तो घरातील दरवाजाच्या जवळ बसला होता. पकडण्यात आलेल्या अजगराची लांबी 10 फूट असून त्याला पाहण्यासाठी  श्यामसुंदर शर्मा यांच्या घराबाहेर गर्दी जमली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या