मुंबईत मुसळधार पाऊस
मुंबई : उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना अखेर दिलासा मिळाला आहे. मुंबई सह उपनगरांत सलग दुसऱ्यादिवशीही पाऊस असल्याने वातावरणात थोडा गारवा निर्माण झाला आहे. शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर मात्र अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यानंतर रविवारी पावसाचा जोर थोडा ओसरला. सोमवारी पहाटेपासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. मुंबई उपनगरात पहाटे ४ वाजल्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. तर नवी मुंबईसह पनवेल भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस आहे. पावसामुळे वाहतूक उशिराने असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही आधीपासूनच नियोजन करुन थोडं लवकर बाहेर पडा.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नवी मुंबई आणि ठाण्यात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. पुढे कल्याण-डोंबिवली ते बदलापूरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. घाटकोपर आणि मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पाऊस. तर दुसरीकडे आज ठाण्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
पावसाळा सुरु झाला की बाथरूममध्ये गांडूळ येतात? मग करा हे सोपे उपायलोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांनी आज थोडं लवकर निघावं कारण पावसामुळे वाहतूक विस्कळीत अथवा उशिराने सुरू राहण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडीही होण्याची शक्यता आहे.
पहिल्या पावसात भिजणं योग्य की अयोग्य, याने खरंच घामोळ्या नाहीशा होतात?मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल या भागांमध्ये आज ऑरेंज अलर्ट आहे. तर संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र तोपर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.