व्हिनेगर : बाथरूममधील गांडूळ घालवण्यासाठी तुम्ही व्हाईट व्हिनेगरचा वापर करू शकता. व्हाईट व्हिनेगर बाथरूममध्ये टाकल्यामुळे केवळ गांडूळंच नाही तर इतर किडे देखील बाथरूममध्ये येणार नाहीत. यासाठी दोन लिटर पाण्यात एक कप व्हिनेगर मिसळा. यापाण्याने बाथरूम नीट स्वच्छ करा आणि शेवटी हे मिश्रण बाथरूममध्ये टाका आणि काही वेळ तसेच राहू द्या.
मीठ : जर तुम्हाला पावसाळ्यात घरात येणाऱ्या गांडूळांना घालवायचं असेल तर त्यांच्यावर मिठाचा वापर करा. गांडूळ दिसल्यावर त्यावर मीठ टाका, जेणेकरून ते निघून जातील आणि त्यानंतर बाथरूमची स्वच्छता करा.
बाथरूम क्लिनर : पावसाळ्यात बाथरूममध्ये गांडूळ येऊ नयेत म्हणून तुम्ही बाथरूम टाईल्सवर बाथरूम क्लिनरची फवारणी करू शकता. जेणेकरून बाथरूममध्ये गांडूळ येणार नाहीत.
बेकिंग सोडा : बाथरूम नेहमी स्वच्छ ठेवा. ड्रेनेज पाईपमध्ये दोन चमचे बेकिंग सोडा टाकून अर्धा तास राहू द्या आणि मग त्या पाईपमध्ये पाणी टाकून स्वच्छ करा. यामुळे बाथरूममध्ये गोम किंवा गांडूळ येणार नाहीत.
स्वच्छता राखा : पावसाळ्यात घराची आणि विशेषतः बाथरूमची अधिक स्वच्छता राखा. जेणेकरून पावसाळ्यातील कीटकांचा शिरकाव घरात होणार नाही आणि घर निरोगी राहील.