संपूर्ण देशात उष्णतेचा कहर सुरूच आहे. देशातील अनेक शहरांमध्ये तापमानाने विक्रमी पातळी गाठली आहे. 

दरम्यान, वर्ल्ड वेदर अॅट्रिब्युशनने नुकताच तापमान वाढण्याचा इशारा दिला आहे.

अहवालात म्हटलं आहे की, सन 1900 पासून पृथ्वीचं तापमान 1.2 अंश सेल्सिअसने वाढले आहे. 

दर 1-2 वर्षांनी पृथ्वीचे तापमान वाढण्याचा ट्रेंड कायम राहणार आहे. 

सध्या भारतात उष्णतेची इतकी भीषण लाट आली आहे की, लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. 

सोमवारी देशातील अनेक भागात तापमानाने 46 अंश सेल्सिअसचा पारा ओलांडला होता. 

अहवालात केवळ भारतासाठीच नाही तर बांगलादेश, थायलंडसारख्या अनेक दक्षिण आशियाई देशांना इशारा देण्यात आला आहे.

41 अंश तापमान पृथ्वीसाठी अत्यंत धोकादायक मानले जाते. पण दक्षिण आशियाई देशांमध्ये ते पार झालं आहे. 

हा अहवाल दक्षिण आशियाई देशांच्या उष्णता आणि आर्द्रतेच्या आधारे तयार करण्यात आला आहे. 

पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे या देशांमध्ये दोन अंशांची वाढ दिसून येत असून येत्या काही वर्षांत त्यात आणखी वाढ होऊ शकते

याला हवामानातील बदलही मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत.