JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Weather Update : पूर्ण राज्यात वाढतेय उष्णता पण या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट

Weather Update : पूर्ण राज्यात वाढतेय उष्णता पण या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट

Weather Update : ‘या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून अलर्ट

जाहिरात

महाराष्ट्रातील या जिल्ह्यात पावसाचा इशारा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : राज्यात एकीकडे कमालीची उष्णता वाढत आहे. अंगाची लाहीलाही होत आहे तर दुपारी घराबाहेर पडल्यानंतर घामाच्या धारांनी अंग भिजत आहे. अशा परिस्थितीत लोक हैराण झाली असून मान्सून लवकर यावा अशी प्रार्थना करत आहेत. एकीकडे राज्यातील उष्णता वाढत असताना एका राज्यात मात्र आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार राज्यातील यवतमाळ जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यालगतच्या भागांमध्ये मात्र हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल. एकीकडे कमालीची उष्णता वाढत असताना मात्र यवतमाळमध्ये पावसाचा अलर्ट दिला आहे.

Mumbai Weather Update : मुंबईकरांची होणार का घामातून सुटका? पाहा आजचे तापमान

दुसरीकडे वायव्य भारतातील अनेक भागांमध्ये प्रामुख्याने 23 ते 25 मे दरम्यान वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे आणि त्यानंतर तापमानात घट होऊ शकते असा अंदाज आहे. आधीच मान्सून उशिराने येत असल्याने पावसाची वाट आणखी पाहावी लागणार आहे.

दिल्ली एनसीआरसह अनेक राज्यांमध्ये कडाक्याच्या उकाड्याने लोक होरपळत आहेत. अशा परिस्थितीत राजधानीतील रहिवाशांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आजपासून हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. 24 मे ते 28 मे दरम्यान राजधानीच्या अनेक भागात पाऊस आणि गारपिटीचा अंदाज आहे.

cyclone : मोचा पाठोपाठ आणखी एका चक्रीवादळाचं संकट, हवामान विभागाकडून अलर्ट

संबंधित बातम्या

पुढील काही दिवस कोकण केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश भागांमध्ये उष्णता वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी भर दुपारी 12 ते 4 कामाशिवाय घरातून बाहेर पडू नये असा सल्ला दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या