जाहिरात
मराठी बातम्या / देश / cyclone : मोचा पाठोपाठ आणखी एका चक्रीवादळाचं संकट, हवामान विभागाकडून अलर्ट

cyclone : मोचा पाठोपाठ आणखी एका चक्रीवादळाचं संकट, हवामान विभागाकडून अलर्ट

चक्रीवादळाचा धोका

चक्रीवादळाचा धोका

या चक्रीवादळाचं नाव फॅबियन आहे. त्याने दक्षिण हिंदी महासागरात धडक दिली असून हळूहळू ते किनाऱ्याकडे सरकत आहे. वाऱ्याचा वेळ प्रचंड आहे.

  • -MIN READ Delhi,Delhi,Delhi
  • Last Updated :

मुंबई : मोचा चक्रीवादळाचे भारतात थेट परिणाम दिसले नसले तरी अप्रत्यक्षपणे परिणाम दिसून आले आहेत. चक्रीवादळ पुढे सरकत असताना भारतातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला. तर जसं वादळ म्यानमारच्या दिशेनं पुढे सरकत होतं तशी उष्णता आणि वातावरणातील शुष्कता जास्त वाढायला लागली. हिटवेटचा इशारा अनेक शहरांना देण्यात आला आहे. मोचा चक्रीवादळानं म्यानमारमध्ये 90 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मोठ्या प्रमाणात तिथे नुकसान झालं आहे. आता मोचा पाठोपाठ आणखी एका चक्रीवादळाचं संकट घोंघावत असल्याची माहिती मिळाली आहे. हे चक्रीवादळ नेमकं कोणतं आहे आणि ते कुठून येत आहे याची माहिती समोर आली आहे. या चक्रीवादळाचं नाव फॅबियन आहे. त्याने दक्षिण हिंदी महासागरात धडक दिली असून हळूहळू ते किनाऱ्याकडे सरकत आहे. वाऱ्याचा वेळ प्रचंड आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यालगतच्या राज्यांना आणि ज्या देशांच्या सीमारेषा समुद्रकिनाऱ्या लगत आहेत त्यांनाही हवामान विभागाने अलर्ट दिला आहे.

मोचा चक्रीवादळाचा धोका, कसं ठरवलं जातं चक्रीवादळाचं नाव?

मोचा पाठोपाठ आता फॅबियन चक्रीवादळानं टेन्शन वाढवलं आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या अलर्टनुसार, किनारपट्टीवर पोहोचण्यासाठी या वादळाला आणखी काही दिवस लागू शकतात. त्याचे दुष्परिणाम आतापासूनच दिसून येऊ लागले आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

एकीकडे कमालीची उष्णता वाढत आहे. वाढत्या उष्णतेमुळे लोक हैराण झाली आहेत. तर म्यानमारमध्ये प्रचंड पाऊस, वादळी वारे यामुळे ठिकठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूर्वेकडील राज्यांमध्ये पाऊस आणि दिल्लीपासून खाली वाढत जाणारी उष्णता अशी स्थिती सध्या देशात पाहायला मिळत आहे.

Cyclone Mocha Interesting Facts : देशावर घोंगावणाऱ्या चक्रीवादळाला मोचा हे नाव कसं पडलं?

सध्या तरी फॅबियन चक्रीवादळाचा भारतावर कोणता थेट परिणाम होणार नाही असं सांगितलं जात आहे. त्यामुळे भारतात मोठं नुकसान होणार नाही. आता याचा परिणाम मान्सूनवर होणार का? हे देखील पाहावं लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात