JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Women's Day 2023: कचरा वेचणाऱ्या महिला बनल्या लघुउद्योजक, पाहा कसा केला हा प्रवास Video

Women's Day 2023: कचरा वेचणाऱ्या महिला बनल्या लघुउद्योजक, पाहा कसा केला हा प्रवास Video

वर्धा शहरातील कचरा वेचक महिलांना स्त्री मुक्ती संघटनेने आधार दिला आहे. विविध लघुद्योगांच्या प्रशिक्षणामुळे त्या स्वावलंबी बनल्या आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी वर्धा, 8 मार्च : समाजातील काही घटक अत्यंत दुय्यम दर्जाची समजली जाणारी कामे करून उदरनिर्वाह करत असतात. शहरातील कचऱ्याच्या ढिगांवर फिरून पुर्नउत्पादक कचरा गोळा करणाऱ्या महिला त्यापैकीच एक आहेत. वर्धा शहरात कचरा गोळा करून गुजराण करणाऱ्या महिलांची वसती आहे. शहराच्या स्वच्छतेत योगदान असले तरी त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. स्त्री मुक्ती संघटनेने अशा महिलांना आधार दिला असून कचरा वेचक महिला आता लघुउद्योजक बनल्या आहेत. महिलांच्या कमाईवर कुटुंबाचा उदरनिर्वाह वर्धा शहरातील आर्वी नाका वडर वसती आणि बोरगाव मेघे परिसरात कचरा वेचक महिला राहतात. कचरा गोळा करून विकणे हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे पहाटेपासूनच शहरातील कचऱ्याच्या ढिगातून त्या पुनर्वापरायोग्य कचरा गोळा करतात आणि भंगारच्या दुकानात विकतात. त्यांच्या या कमाईवरच संपूर्ण कुटुंबाचा आर्थिक भार असतो.

समाजाकडून उपेक्षा शहरातील कचरा कमी करण्यात कचरा वेचक महिलांचे महत्त्वाचे योगदान असते. तरीही या महिलांना बऱ्याचदा उपेक्षा आणि दूर्व्यवहाराचा सामना करावा लागतो. तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहापासून हा वर्ग दूर असतो. त्यांच्या मूलभूत गरजाही पूर्ण होत नाहीत. तसेच बऱ्याचदा ओळखपत्रे किंवा आवश्यक कागदपत्रे नसल्याने त्यांना सरकारी योजनांचा लाभही मिळत नाही. Women’s Day 2023: कधी उंबरठाही न ओलांडणारी ‘ती’ सांभाळते गावचा कारभार, पाहा Video स्त्री मुक्ती संघटनेचे काम स्त्री मुक्ती संघटना ही मुंबईतील एक स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेने 1998 मध्ये मुंबईच्या आजुबाजूच्या परिसरात काम करणाऱ्या कचरा वेचक महिलांचे सर्वेक्षण करुन त्यांच्यासाठी काम सुरू केले. तर 2016 मध्ये पॉल हेम्लिंग फाउंडेशनच्या शुन्य कचरा व्यवस्थापन या प्रकल्पांतर्गत वर्धा व यवतमाळ येथील कचरा वेचक महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यांच्यासोबत स्त्री मुक्ती फाउंडेशनने कामास सुरुवात केली. आर्वी नाका वसतीतील महिलांचे 6 बचतगट तयार केले. त्यातली 5 बचतगट गेल्या 5 वर्षांपासून व्यवस्थित सुरू आहेत. महिलांना ओळख देण्याचे काम स्त्री मुक्ती संघटना वर्धा शाखेच्या मदतीने कचरा वेचक महिलांना आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचे प्रमाण पत्र आदी आवश्यक कागदपत्रे बनवून देण्यात आली. नगरपरिषदेकडून ओळखपत्र देण्यात आले. निराधार योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यात आला. त्यामुळे सरकारच्या विविध योजनांचा लाभ या महिलांना मिळत आहे. Women’s Day 2023 : मासिक पाळीतील महिलांचा त्रास कमी करणारी उद्योजिका! पाहा संघर्षमय प्रवासाचा Video महिलांना लघुद्योगांचे प्रशिक्षण आर्वी नाक्यातील बचत गटांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आले. अगरबत्ती, मेणबत्ती, मुलतानी माती पासून साबण तयार करणे, हॅण्डवॉश, सॅनिटायजर आदी तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच या महिलांना जैविक खत, नर्सरी, बाग तयार करने, बाग देखरेखीच्या कामाचेही प्रशिक्षण दिले. त्यामुळे या महिला घरीच या विविध वस्तूंची निर्मिती करून स्वावलंबी बनत आहेत. तसेच शिवणकामाचे प्रशिक्षण घेऊन स्वत:चा व्यवसाय करत आहेत. बँकेकडून कर्ज, नगरपरिषदेकडून काम कचरा वेचक महिलांना विविध लघुउद्योग सुरू करण्यासाठी बँकांनी बचत गटाच्या माध्यमातून कर्ज दिले आहे. तर काही महिलांना व्यक्तिगत कर्जही दिले आहे. विशेष म्हणजे या महिला व बचत गट नियमित परतफेड करत आहेत. तसेच नगरपरिषदेनेही कचरा वेचक महिलांच्या बचत गटांना इंदिरा उद्यान व संभाजी उद्यान या दोन उद्यानांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम दिले आहे. Women’s Day 2023 : कडू निंबोळीने संसारात पेरला गोडवा! 30 महिलांनी एकत्र येत सुरु केला उद्योग, पाहा Video कचऱ्यापासून खत निर्मिती कचरा व्यवस्थापनाचे कार्य 2019 पासून सुरु झाले. या महिला घरोघरी जाऊन ओला कचरा जमा करतात. कॉलनीतील ऑक्सिजन पार्कमध्ये कचऱ्यापासून खत तयार करतात. व त्यापासून सेंद्रिय भाजीपाला निर्मितीचे कामही करतात. त्यांना योग्य प्रशिक्षण मिळाल्याने त्या आर्थिक स्वावलंबी बनत आहेत. स्त्री मुक्ती संस्थेच्या कार्यामुळे त्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या