प्रियांका बोबडे, प्रतिनिधी अहमदनगर, 8 मार्च: सध्या नोकरी, व्यवसाय, राजकारण, समाजकारण अशा सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. अनेक महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा राजकारणातही उमटवला आहे. एखादी महिला संधी मिळाल्यास तिचं सोनं करू शकते, हेच अहमदनगर जिल्ह्यातील सुपा गावच्या सरपंचांनी दाखवून दिले आहे. विद्यमान सरपंच मनिषा योगेश रोकडे यांनी कधी घराचा उंबरठा ओलांडला नाही पण आता त्या गावचा कारभार सांभाळत आहेत. सरपंच पदाची संधी सुपा गावची 2021 मध्ये ग्रामपंचायत निवडणूक झाली. या निवडणुकीत गावच्या इतिहासात दुसऱ्यांदा महिला सरपंच झाली. मनिषा योगेश रोकडे यांना ही संधी मिळाली. मनिषा या सुपा गावच्या सून आहेत. त्यांचे दहावी पर्यंत शिक्षण झाले आणि त्यानंतर विवाह झाला. कमी वयातच संसाराची जबाबदारी आली. त्यामुळे त्या वैवाहिक आयुष्यात गुंतून गेल्या. मात्र, सरपंचपदाची संधी मिळाली आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
गावच्या विकासाचा ध्यास कधी घराचा उंबरठाही न ओलांडलेल्या मनिषा यांना सरपंचपद सांभाळणे तसे आव्हानात्मक काम होते. परंतु, त्यांनी सर्व बाबींचा अभ्यास केला. गावचा कारभार आपली जबाबदारी म्हणून पाहायला सुरुवात केली. गावच्या विकासाचा ध्यास घेतला. गावातील विविध कामांना हात घालत रस्ते, वीज, पाणी, गटार, कचऱ्याचे प्रश्न मार्गी लावले. पहिल्याच वर्षी 5 कोटींची विकासकामे केली. Women’s Day 2023 : मासिक पाळीतील महिलांचा त्रास कमी करणारी उद्योजिका! पाहा संघर्षमय प्रवासाचा Video गावातील शाळांवर विशेष लक्ष सरपंच मनिषा रोकडे यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले असले तरी त्यांना शिक्षणाचे महत्त्व माहिती आहे. सुपा गावच्या हद्दीत 6 जिल्हा परिषद शाळा आहेत. या शाळांना लागेल ती मदत ग्रामपंचायत निधीतून त्यांनी केली. शाळांचे सुशोभीकरण, पेव्हींग ब्लॉक बसवणे, शैक्षणिक साहित्य पुरवणे या माध्यमातून शाळांच्या प्रगतीसाठी त्या प्रयत्नशील आहेत. तसेच गावात पक्के रस्ते तयार करून त्यावर पथदिवे लावले. पती योगेश रोकडे व कुटुंबाची साथ मनिषा यांना त्यांच्या कामात पती योगेश रोकडे आणि त्यांच्या कुटुंबीयांचीही साथ मिळते. गावची जबाबदारी सांभाळताना त्या कौटुंबीक कर्तव्येही पार पाडतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून 11 सदस्यांचे एकत्र कुटूंब आहे. एक गृहिणी म्हणूनही घरातील सर्व जबाबदाऱ्याही त्या पार पाडतात. Women’s Day 2023: कडू निंबोळीने संसारात पेरला गोडवा! 30 महिलांनी एकत्र येत सुरु केला उद्योग, पाहा Video गोरगरिबांना मदत मनिषा रोकडे या गावातील सर्व कामांसाठी आणि गोरगरिबांच्या मदतीसाठी तत्पर असतात. गावात भटक्या समाजातील गरोदर महिलेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा रात्री साडेबारा वाजता सरपंचांना फोन आला. मनिषा यांनी तात्काळ महिलेला घेऊन रुग्णालय गाठले. वेळेत उपचार मिळाल्याने आई आणि बाळ सुखरूप आहेत. गोरगरिबांच्या मदतीला धावून जात असल्याने सरपंच म्हणून त्या लोकप्रिय आहेत. जागतिक महिला दिनी त्यांचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.