धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 8 मार्च : मासिक पाळीमुळे महिलांना दर महिन्याला खूप त्रास सहन करावा लागतो. भारतात आजही अशी परिस्थिती आहे की मासिक पाळीवर बोलले जात नाही किंवा हा विषय टाळला जातो. या विषयावर आजही काम खूप कमी प्रमाणात काम केलं जातं. यामुळे या विषयावर जास्तीत जास्त काम व्हावे साठी यासाठी मुंबईतील डोंबिवली परिसरात राहणाऱ्या प्रतिभा कुऱ्हाडे यांनी सॅनिटरी नॅपकिन पॅड बनविण्याची कंपनी स्थापन केली आहे. जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचा हा प्रवास कसा आहे पाहूया. कधी झाली सुरुवात? मुंबईतील डोंबिवली परिसरात राहणाऱ्या प्रतिभा कुऱ्हाडे प्लॅस्टिक मुक्त कॉटनचे पॅड तयार करतात. यासाठी त्यांनी कोलेस्ट्रो हायजिन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन केली. गेल्या साडे तीन वर्षांपासून त्या ही कंपनी चालवीत आहेत. सर्व सामान्य महिला ते उच्चभृ महिला या सर्वांना परवडेल अशा प्रकारचे पॅड तयार केले जातात. ज्याची किंमत 35 रुपयांपासून ते 350 रुपयांपर्यत आहे.
कशी झाली सुरुवात? भारतात आजही अशी परिस्थिती आहे की मासिक पाळीवर बोलले जात नाही किंवा हा विषय टाळला जातो. या विषयावर आजही काम खूप कमी प्रमाणात काम केलं जातं. मी एका गावात गेली असताना मला सॅनिटरी नॅपकिन पॅडची गरज लागली. तेव्हा गावातल्या कोणत्याही दुकानात ते उपलब्ध नव्हतं. दुकानात कोल्ड्रिंस मिळतं मात्र उपयुक्त गरजेची असलेलं सॅनिटरी नॅपकिन पॅड नाही मिळत आहे. अभ्यास करायला सुरुवात केली. तेव्हा कळलं की प्रगत राज्यामध्ये सुद्धा सॅनिटरी नॅपकिनच वापर करणाऱ्या महिला कमी आहेत. विषयावर जास्तीत जास्त काम व्हावे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सॅनिटरी नॅपकिन बनविण्याची कंपनी सुरू केली आहे, असं प्रतिभा कुऱ्हाडे सांगतात. खंबीर पाठींबा दिला कोणतीही गोष्ट सोपी नसते जर विरोध झाला तरच आपण एवढ्या जिद्दीने उभे राहू शकतो. ज्यावेळी व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला त्यावेळेस घरातूनच या गोष्टीचा विरोध झाला. स्त्रिया नात्याने घर सांभाळणं ही जबाबदारी होती. बाहेर गेलो तर दुर्लक्ष होईल अशा काही गोष्टी असतात. मात्र, एक महिला म्हणून या सर्व गोष्टी हाताळणं एवढी एका महिलेमध्ये ताकद असते. त्यावेळी ठरवलं की घराकडे दुर्लक्ष न करता व्यवसाय सुद्धा करायचा. त्यावेळी बहीण, मैत्रीण, मुलगी यांनी मला खंबीर पाठींबा दिला, असं प्रतिभा यांनी सांगितले.
माझी मुलगी कलेक्टर व्हावी असं मला वाटतं तर आई म्हणून मी कुठे आहे. पण काही तरी स्वतःचं अस्तित्व शोधन खूप गरजेचं होतं. प्रत्येक महिलेला तिचा अस्तित्व असावं आणि त्या अस्तित्व शोधत असतानाच आज कॅलेस्ट्रो हायजिन प्रायव्हेट लिमिटेड एवढी मोठी कंपनी उभी राहिली. सॅनिटरी पॅड, तसेच वेन्डिंग मशिन तयार करून ती कमी किंमतीत शहरातील तसेच ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहचावी याकरिता कंपनीच्या माध्यमातून काम केलं जातं आहे. अनेक ग्रामीण भागातील शालेय मुलींपर्यंत कमी किंमतीत सॅनिटरी पॅड पोहचविले जात आहेत. आदिवासी पाडे, खेडे गावात इथे सॅनिटरी पॅड पोहचविले जात आहेत, असंही त्यांनी सांगितले.