JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पोट्यांनो, क्लास वन अधिकारी व्हायचं व्हय तुम्हाला? कराळे गुरजींचा स्पेशल कानमंत्र ऐका VIDEO

पोट्यांनो, क्लास वन अधिकारी व्हायचं व्हय तुम्हाला? कराळे गुरजींचा स्पेशल कानमंत्र ऐका VIDEO

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून चांगली नोकरी मिळवण्याचा सर्वांचा प्रयत्न असतो. त्यांच्यासाठी नितेश कराळे गुरुजींनी खास मंत्र दिला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वर्धा, 23 जुलै: स्पर्धा परीक्षाची तयारी करून आपण अधिकारी बनावं असं प्रत्येक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. त्यासाठी विद्यार्थी रात्रंदिवस एक करून कठोर परिश्रम घेऊन जिद्दीने अभ्यास करताना दिसतात. मात्र त्यातील काहीच विद्यार्थ्यांचं अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण होतं. तुम्हाला जर स्पर्धा परीक्षेत चांगले गुण घेऊन यशाचं शिखर गाठायचं असेल तर वर्धा येथील नितेश कराळे गुरूंजींनी सांगितलेले काही नियम तुम्ही नक्कीच पाळणे गरजेचे आहे. नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेचा पर्याय सध्याच्या काळात चांगली नोकरी मिळवण्याचा सर्वांचा प्रयत्न असतो. त्यासाठी स्पर्धा परीक्षा हाच चांगला मार्ग आहे. अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतात. परंतु, हा अभ्यास करताना काही नियम घालून घेण्याची गरज असते. तसेच योग्य मार्गदर्शनाची गरज असते. योग्य मार्गदर्शन मिळाले नाहीतर यशापर्यंत पोहोचण्यात अडथळे येत असतात. त्यामुळे वर्धा येथील कराळे गुरुजींनी काही खास टिप्स सांगितल्या आहेत.

शालेय जीवनापासूनच असावी ही सवय सध्याच्या काळात प्रवेशापासून ते नोकरीपर्यंत सातत्याने स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते. त्यामुळे विद्यार्थीदशेपासूनच वाचनाची सवय आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत असतानापासूनच वर्तमानपत्रे वाचण्याची सवय करून घ्यावी. सोबतच वृत्तपत्रांतील संपादकीय नियमित वाचावे. न्यूज चॅनल बघून चालू घडामोडींवर लक्ष ठेवणे आणि त्या लक्षात ठेवणेही गरजेचे आहे, असे कराळे गुरुजी सांगतात. फक्त 75 घरं अन् 50 पेक्षा जास्त मुलं आहेत सरकारी अधिकारी, महाराष्ट्रातील कोणते आहे ‘हे’ गाव, पाहा PHOTOS परीक्षेचा अभ्यास करताय? स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी सराव करणं, अभ्यासात सातत्य ठेवणं गरजेचं आहे. अभ्यास हा मन लावून करा आणि विद्यार्थ्यांनी ताणमुक्त वातावरणात अभ्यास करावा. यशाचं उंच शिखर गाठायचं असेल तर त्यासाठी जिद्द चिकाटी, मेहनत या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. याव्यतिरिक्त स्वप्नांना सत्यात उतरवायचे असेल तर स्मार्ट स्टडी करण्याचीही गरज असते. त्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या प्राध्यापकांनी दिलेला यशाचा हा मंत्र विद्यार्थ्यांना लक्षात ठेवावाच लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या