JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Wardha News: शेतकऱ्याच्या लेकीने बापाचं नाव काढलं, दहावीत तालुक्यातून अव्वल, Video

Wardha News: शेतकऱ्याच्या लेकीने बापाचं नाव काढलं, दहावीत तालुक्यातून अव्वल, Video

नुकताच दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत वर्ध्यातील वैष्णवी चाफले ही शेतकरी कन्या तालुक्यात अव्वल आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमिता शिंदे, प्रतिनिधी वर्धा, 5 जून: दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचं जिल्ह्यात कौतुक सुरू आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपलं पुढचं ध्येय ठरवलं आहे. वर्धा जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. शेतकरी कन्या वैष्णवी प्रदीपराव चाफले हिने तब्बल 94.80 टक्के गुण मिळवून सेलू तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. वैष्णवीचे आई-वडील दोघेही शेतकरी असून घरची परिस्थिती बेताची आहे. मात्र, परिस्थितीवर रडत न बसता जिद्द, चिकाटी आणि मेहेनतिने तिने यशाला गवसणी घातली आहे. केंद्रातून वैष्णवी ठरली प्रथम सिंदी रेल्वे येथील केसरीमल नगर विद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी हिने केंद्रातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा, शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. वैष्णवी आणि तिची बहीण आई-वडिलांना दोन्ही मुलीच आहेत. अभ्यासात हुशार असल्यामुळे आई-वडिलांचं मुलींना खूप शिकवून मोठ्या पदावर बघण्याचं स्वप्न आहे. वैष्णवीला घरच्या परिस्थितीची जाण आहे. त्यामुळे ती डॉक्टर बनण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे.

वैष्णवीचं डॉक्टर बनविण्याचा स्वप्न वैष्णवी अभ्यासात प्रचंड हुशार मात्र घरची परिस्थिती हालाकिची आहे. त्यामुळे शिकवणीच्या शिक्षकांनीही तिला मोफत शिकविण्याचा निर्णय घेतला असून त्यांनीही तिच्या उज्वल भविष्यासाठी सहकार्य केले आहे. वैष्णवीला आता बारावीच्या परीक्षेसाठीही चांगली तयारी करायची आहे. भविष्यात खूप अभ्यास करून वैष्णविला डॉक्टर व्हायचंय. त्यासाठी तिचे कुटुंबीय आणि शिक्षक मोलाचे सहकार्य करत आहेत. आजोबांनी दिला यशाचा मंत्र, फर्निचर बनवणाऱ्याची मुलगी जिल्ह्यात अव्वल, Video शिक्षकांनी घरी भेट देऊन केलं अभिनंदन लहानपणापासून वैष्णवी अभ्यासात हुशार आहे. सर्व शिक्षकांना तिच्यावर गर्व आहे. दहावी परीक्षेत 94.80 टक्के प्राप्त करून केंद्रातून प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे तिच्या शिक्षकांनी घरी भेट देऊन तिचं अभिनंदन केलं. ग्रामीण भागातील शेतकऱ्याची लेक वैष्णवी तिच्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर डॉक्टर होण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण करेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या