जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Wardha News: आजोबांनी दिला यशाचा मंत्र, फर्निचर बनवणाऱ्याची मुलगी जिल्ह्यात अव्वल, Video

Wardha News: आजोबांनी दिला यशाचा मंत्र, फर्निचर बनवणाऱ्याची मुलगी जिल्ह्यात अव्वल, Video

Wardha News: आजोबांनी दिला यशाचा मंत्र, फर्निचर बनवणाऱ्याची मुलगी जिल्ह्यात अव्वल, Video

Wardha News: आजोबांनी दिला यशाचा मंत्र, फर्निचर बनवणाऱ्याची मुलगी जिल्ह्यात अव्वल, Video

नुकताच महाराष्ट्रातील दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला. वर्ध्यातील फर्निचर बनवणाऱ्याच्या मुलीनं घवघवीत यश मिळवलं असून 98 टक्के गुणांसह जिल्ह्यात अव्वल आलीय.

  • -MIN READ Wardha,Maharashtra
  • Last Updated :

अमिता शिंदे, प्रतिनिधी वर्धा, 3 जून: विद्यार्थी जीवनातील पहिला महत्त्वाचा टप्पा म्हणजे दहावीचा निकाल होय. नुकताच महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला. अनेक विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण प्राप्त केले असून काही विद्यार्थ्यांनी घरच्या अतिशय साधारण परिस्थितीतून प्राविण्य प्राप्त केले आहे. वर्ध्यातील नुपूर नरेंद्रराव वाडेकर हिनं 98 टक्के गुण प्राप्त करत जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. शिक्षक, आजोबांचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांच्या प्रोत्सहानामुळे तिने हे यश संपादन केले असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. 98 टक्के गुणांसह नुपूर जिल्ह्यात अव्वल नुपूर ही वर्ध्यातील रत्‍नीबाई विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिने दिवस-रात्र मेहनत करून अभ्यास केला आणि सर्वच विषयात कौतुकास्पद गुण प्राप्त केले. विशेषतः संस्कृत या विषयांमध्ये शंभर पैकी 100 गुण घेत बाजी मारलीय. नुपूरला मराठी विषयात 97, संस्कृत मध्ये 100, इंग्लिश विषयात 99, गणितात 89, विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयात 98, सामाजिक शास्त्रे विषयात 96 गुण प्राप्त झाले आहेत. तर 98 टक्के गुणांसह ती जिल्ह्यात अव्वल आली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

वडिलांचा फर्निचर बनविण्याचा व्यवसाय नुपूरचे वडील फर्निचर बनवण्याचा व्यवसाय करतात. आई ज्योत्स्ना वाडेकर गृहिणी आहेत. घरची परिस्थिती साधारण असूनही तिने अभ्यासात लक्ष केंद्रित केलं आणि तिच्या मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश संपादन केला आहे. तिचं यश हे कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणणारे आहे. शाळेतील शिक्षकांनी मनस्वी अभिनंदन केले आहे. तसेच तिचे शुभचिंतक तिच्या घरी भेट देऊन पुष्पगुच्छ देत शुभेच्छा देत आहेत. आता बारावीच्या परीक्षेवर लक्ष नुपूरने तिला भविष्यात काय व्हायचं हा विचार सध्याच केलेला नाही. तर तिच्यासाठी पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे बारावीची परीक्षा आहे. त्यामुळे बारावीच्या परिक्षेवर लक्ष केंद्रित केलं असून विज्ञान शाखेतून तिला पुढे जायचं आहे. बारावीच्या परीक्षेतही तिला उत्कृष्ट गुण प्राप्त करत क्रमांक पटकावयचा आहे, असं नुपूरनं सांगतिलं. Dombivli News : तिला पायावर उभा राहणेही कठीण, शिक्षक घरी येऊन शिकवायचे, आज समृद्धीने मिळवले 83 टक्के शिक्षकांसह कुटुंबीयांना मोठा आनंद नुपूर ही लहानपणापासूनच अभ्यासात हुशार त्यामुळे शिक्षकांची अतिशय लाडकी विद्यार्थिनी आहे. नुपूरने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावल्याची बातमी ऐकताच शिक्षक आणि कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने दहावीच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त केल्याचे श्रेय आई-वडील, आजी-आजोबा तसेच शिक्षकांना दिलंय. शाळेतही तिचे अभिनंदन करण्यात आले असून कुटुंबीयांनी देखील पेढा भरवत तिला शाबासकी दिली आहे. नुपूर तिच्या भविष्यात अशीच उत्तुंग भरारी घेईल याच शुभेच्छा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात