JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Wardha News: महात्मा गांधींच्या 'आखरी निवास'चं होणार जतन, पाहा कसं सुरूय काम, Video

Wardha News: महात्मा गांधींच्या 'आखरी निवास'चं होणार जतन, पाहा कसं सुरूय काम, Video

सेवाग्राम आश्रमात ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि छताचे नुतनीकरण केले जात असून लाकडी फाट्या आणि कवेलूच्या साह्याने पुनर्रर्रचना केली जात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमिता शिंदे, प्रतिनिधी वर्धा, 9 जून: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वर्ध्याच्या ऐतिहासिक सेवाग्राम आश्रमातील वास्तू जतन केल्या जात आहेत. सध्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमातील आखरी निवास या वास्तूला जतन करण्याचं काम सुरू आहे. नव्याने लाकडी फाटे आणि कवेलुंची पुनर्रचना करून पावसाळ्यापूर्वीची देखभाल सुरू आहे. आखरी निवास हे महात्मा गांधी यांचं वर्ध्यातील शेवटचं निवासस्थान म्हणून ओळखलं जातं. पावसाळ्यापूर्वी आश्रमातील वास्तूंची देखभाल पावसाळा ऋतू काहीच दिवसांवर आहे. सेवाग्राम आश्रमातील सर्व कुटी या पारंपारिक पद्धतीने जपल्या गेल्या आहेत. आश्रमातील सर्वच वास्तू या माती, लाकूड आणि कवेलूने बनलेल्या असल्यामुळे पावसाळ्यात या वास्तूंना हानी पोहोचण्याची शक्यता असते. या ऐतिहासिक वास्तूंना जपणे त्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. त्यामुळे आश्रमातील कर्मचारी सध्या या आखरी निवासच्या छतावर लाकडी फाटे आणि कवेलू रचण्याच्या कामात व्यस्त असताना दिसत आहेत. बापूंच्या विचाराप्रमाणे आजही त्यांच्या कुटीचं रक्षण केलं जातंय.

बापूंची विचारधारा जपण्यासाठी प्रयत्न सेवाग्राम आश्रमातील आखरी निवासच्या छताच्या नूतनीकरणाचे काम जोमात सुरू आहे. बापूंच्या आठवणी आणि विचारधारा जोपासण्याचा प्रयत्न होत आहे. आश्रम परिसरात ‘आदी निवास’, ‘बापू कुटी’, ‘बा कुटी’, ‘बापू दप्तर’, ‘परचुरे कुटी’,‘आखरी निवास’ अशा कुट्या आहेत. या सर्व बापूंच्या काळातील त्यांच्या चळवळीची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक वास्तू ठरल्या आहेत. महात्मा गांधीजींच्या आठवणी जपण्याकरिता आश्रमातील प्रशासन आणि सर्व कर्मचारी हे पारंपरिक पद्धतीनं इथल्या सर्वच वस्तूंचा सांभाळ करीत आहेत. आश्रमातील सर्व स्मरकांचा पारंपरिक सांभाळ 1936 मध्ये महात्मा गांधी वर्ध्याच्या सेवाग्राममध्ये आले. इथल्या कुटीचं निर्माण ग्रामीण वस्तूंपासून आणि स्थानिक लोकांच्या मदतीने व्हावे, ही गांधीजींची इच्छा होती. त्यावेळेस महात्मा गांधींची पहिली कुटी मात्र 100 रुपयात बनवण्यात आली असल्याचं सांगितलं जातं. सेवाग्राम आश्रमात जेव्हा कुटीचं काम करण्यात आलं तेव्हा स्थानिक वस्तूंचा वापर करण्यात आला. त्यात लाकूड फाटा असो की इतर साहित्य आणि मजूर यांच्या साहाय्याने बनविण्याचा महात्मा गांधींचा आग्रह होता. त्यामुळे 85 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटूनही इथल्याच वस्तूंचा उपयोग करत ऐतिहासिक वास्तूचं संरक्षण केलं जातं. मृत्यूच्या दारावर आई सोडून गेली, आज जग्गू 17 महिन्याचा झाला, दृष्टीही परतली VIDEO वर्ध्यात बापूंचा ‘आखरी निवास’ आखरी निवास येथे असलेली कुटी ही बा कुटीच्या जवळच जमनालाल बजाज यांनी स्वतःसाठी बांधून घेतली होती. मात्र, ते या ठिकाणी राहू शकले नाही. बापूचे मुख्य सचीव महादेवभाई हे इथे सहकुटुंब राहिले. आखिरी निवास ही आश्रमातील सर्वात उंच कुटी होती. त्यामुळे गांधीजी इथे राहू लागले. देशाच्या फाळणी दरम्यान बंगालच्या नोआखाली मध्ये सांप्रदायिक दंगे भडकले होते. महात्मा गांधीजी शेवटी याच कुटीतून बंगालसाठी रवाना झाले. मात्र ते परत येऊ शकले नाहीत. महात्मा गांधी यांचं शेवटचे 6 महिने याच कुटीत वास्तव्य होतं. म्हणून या कुटीला ‘आखरी निवास’ अशी ओळख आहे. परदेशातूनही येतात पर्यटक सेवाग्राम आश्रमाची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख आहे. या ठिकाणी भारतातूनच नाही तर परदेशातूनही पर्यटक आवर्जून भेट द्यायला येत असतात. म्हणून आश्रमातील कुटींचं जतन पारंपरिक पध्द्तीन करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळं आजही आश्रमात परंपरांचा ठेवा जपला जात आहे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या