JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कडवट आहे पण भारी लागते रानभाजी, पावसाळ्यात आजारांपासून ठेवते तुम्हाला दूर! Video

कडवट आहे पण भारी लागते रानभाजी, पावसाळ्यात आजारांपासून ठेवते तुम्हाला दूर! Video

ही एक आयुर्वेदिक औषधी भाजी आहे. तरोटाच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. ती पौष्टिक आणि वातनाशक आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वर्धा, 21 जुलै :  वनवैभवाने नटलेल्या आपल्या राज्यात राजनभाज्यांची कमतरता नाही. पावसाळा सुरू होताच अनेक रानभाज्या मिळू लागतात. या दुर्मीळ भाज्या खाण्यासाठी सर्वांचीच पसंती असते. शेतात, जंगलात, डोंगराळ भागात तसंच मोकळ्या मैदानात या भाज्या वाढतात. या परिसरातील महिला त्या भाज्या नेमकेपणाने ओळखून, तोडून घरी आणतात. त्याधीलच एक भाजी म्हणजे तरोटा. वर्धा जिल्ह्यात ही भाजी चांगलीच लोकप्रिय आहे. तरोटा या रानभाजीला टाकळा, तरवटा, चक्रमर्द यासारख्या नावानेसुद्धा ओळखले जाते. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव कॅशिया टोरा आहे. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. तरोटाच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. ती पौष्टिक आणि वातनाशक आहे, असं सांगितलं जातं.

कडवट चवीची औषधी भाजी रोगप्रतिकार शक्ती  आणि डायटरी फायबर त्याचबरोबर सर्व प्रकारची सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळण्याकरिता रानभाज्या खाव्यात. कोवळ्या अवस्थेतील रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर असतात. तरोटा ही रानभाजी असून ती पावसाळ्यात उगवते. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्या या भाजीला फुलं येतात. मेथीच्या भाजीप्रमाणे ही भाजी दिसते. ही भाजी चवीला थोडी कडवट असते, पण त्वचेच्या सर्व रोगांवर परिणामकार ठरते. ही रानभाजी पाचक असल्यानं श्रावण महिन्यात आवर्जून खाल्ली जाते, अशी माहिती जाणकारांनी दिली आहे. जंगलात वाढतात या रानभाज्या आणि औषधी वनस्पती, आरोग्यासाठी आहे फायदेशीर कशी तयार करावी भाजी? सुरुवातीला पानं वेगवेगळी तोडून घ्या. ही तोडलेली भाजी पाण्यात चांगली उकळून घ्या. त्यामधील पूर्ण पाणी काढून ते साध्या पाण्यानं धुवून घ्या. त्यामुळे भाजीतला कडवटपणा निघून जाईल. या भाजीत आवडीनुसार कांदा टाकावा. गरम तेलामध्ये कांदा, लाल किंवा हिरवी मिरची वापरु शकता. कांदा आणि मिरची थोडी शिजल्यानंतर त्यात हळद आणि तिखट मिसळा. उकळलेल्या तरोट्याची भाजी त्यात एकत्र करा. त्याला मेथीच्या भाजीप्रमाणे शिजू द्या. आता तरोट्याची भाजी खाण्यास तयार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या