जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जंगलात वाढतात या रानभाज्या आणि औषधी वनस्पती, आरोग्यासाठी आहे फायदेशीर Video

जंगलात वाढतात या रानभाज्या आणि औषधी वनस्पती, आरोग्यासाठी आहे फायदेशीर Video

जंगलात वाढतात या रानभाज्या आणि औषधी वनस्पती, आरोग्यासाठी आहे फायदेशीर Video

या औषधी वनस्पती आणि रानभाज्याचे सेवन हे मानवी आरोग्याला फार गुणकारी असल्याचे मानले जाते.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 21 जुलै: पावसाळ्याच्या दिवसात माळराणावर, जंगलात, अथवा काही विशेष ठिकाणी अनेक प्रकारच्या रानभाज्या आणि औषधी वनस्पती उगवत असतात. या औषधी वनस्पती आणि रानभाज्याचे सेवन हे मानवी आरोग्याला फार गुणकारी असल्याचे मानले जाते. मात्र त्यांची ओळख आणि इत्यंभूत माहिती असणे हे देखील महत्त्वाचे आहे. डोंगराळ, दुर्गम, वस्तीवरील, गावखेड्यातील आदिवासी बांधव त्यांचे पारंपारिक अन्न म्हणून आजही जंगलातील वनस्पतींचाच वापर करतात. नव्या पिढीतही जुन्या पिढीतील भाज्यांचे हे ज्ञान कायम असून या रानभाज्या त्यांच्या दैनंदिन अन्नातील अविभाज्य घटक आहेत. अश्याच काही वनस्पती आणि रानभाज्या विदर्भातील मेळघाटच्या जंगलात देखील सापडत असतात. या औषधी वनस्पती आणि रानभाज्या कोणत्या आणि त्यांचे काय महत्त्व आहे याचीच माहिती कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय चिखलदरा येथील प्राध्यापक आणि वनस्पतीशास्त्र विभागाच्या मुख्य डॉक्टर उज्वला कोकाटे यांनी दिली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

मेळघाट- सातपुडा डोंगररांगातील समृध्दवन संपदा निसर्गचक्रात बदलणाऱ्या प्रत्येक ऋतू प्रमाणे त्या त्या ऋतूनुसार पीक येत असतं. त्यात काही भाज्या या मनुष्याने जमिनीत मशागत करून पीक घेतलेले असते तर काही भाज्या किंवा वनऔषधीचे पीक हे जंगलात, रानमाळावर किंवा अन्यत्र आपसुक आलेले असते. पावसाळा सुरु झाला की बाजारात रान भाज्या दिसायला लागतात. पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या या रानभाज्या चवीला रुचकर असतात. शिवाय त्या पौष्टिक आणि औषधीसुद्धा असतात. मेळघाटातील सातपुडा डोंगररांगातील दुर्गम भागात अशाच असंख्य वनौषधी आणि रानभाज्यांचे पीक पावसाळ्यात येते. कोणत्या भाज्या येतात? चिखलदरा येथे असलेल्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने वनस्पतीशास्त्र विषय शिकला जातो. त्यात आम्ही मेळघाट वन क्षेत्रात भेटणाऱ्या वनौषधी आणि रानभाजी त्याची लागवड करत असतो. तसेच या रानाभाज्या आणि वनौषधी अतिशय गुणकारी असून मेळघाटातील वनवैभव आहेत. दैनंदिन जीवनातील आहारात आपण रासायनिक फवारणी केलेल्या अनेक हायब्रीड प्रकारच्या पालेभाज्या खात असतो. त्यामुळे अनेक आजार देखील उद्भवत असतात. मात्र आजही या माळरानावर उगवणाऱ्या सेंद्रिय फळभाज्या या आरोग्यास उपाय कारक ठरत असून अनेक रोगांवर उपचार वर्धक आहेत. यामध्ये प्रामुख्याने जीवती, चोकोरा ही पानभाजी, चित्रक किंवा कोरकू भाषेमध्ये चित्रू या नावाने ओळखली जाणारी पानभाजी आहे. राजगिरी लाल पानाची भाजी, पाथरी, बाणा, पानफुटी, तरोटा इत्यादी पानभाजी तसेच पावसाळ्यात येणाऱ्या मशरूम हे प्रामुख्याने मेळघाटात आढळून येतात, अशी माहिती प्राध्यापक आणि वनस्पतीशास्त्र विभागाच्या मुख्य डॉक्टर उज्वला कोकाटे यांनी दिली.

Local Food: अंबाडीची भाकरी कधी खाल्लीय का? पाहा गावाकडची रेसिपी

काय फायदे? मेळघाटाच्या जंगलात उगवणाऱ्या या वनौषधी व रानभाज्यांमध्ये प्रोटीन्स कार्बोहायड्रेट, हिमोग्लोबिन, अनेक विटामिन्ससह असंख्य औषधी गुणधर्म आहे. विद्यालयाच्या वनस्पती गार्डनमध्ये आजघडीला जवळजवळ 55 प्रकारच्या मेळघाटातील वनौषधी वनस्पती लावल्या आहेत. यामध्ये सिताफा ही वनौषधी जनता झाल्यास गुणकारी आहे. तुया लहान मुलं औषध घ्यायला कानाडोळा करत असतात. अशावेळी या पानाचा रस बाळाच्या बेंबीला लावल्यास जंत आजारावर उपचार होतात. त्याचप्रमाणे पानफुटी या वनस्पतीचा मुतखड्यावर उपयोग होतो. अडुळसा ही सर्दी खोकला पडस यावर गुणकारी आहे. भुई आवळा याचा काढा केल्यास तो खोकला ताप पडसं यावर गुणकारी मानला जातो. रानवांगी ही लहान आकाराची आणि पानांना काटेदार असलेली वनस्पती आहे. कोरफड अतिशय गुणकारी आणि अनेक वनौषधीमध्ये वापरल्या जाते. विशेषता मेळघाटात लागणारा मिठा हे विशेष असून हिमोग्लोबिन किंवा सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरला जातो. त्याचा वास हा गर्द असतो. आंबी हळद ही जखमेवर किंवा सुजन आल्यास त्याचा उपयोग होतो. अशा असंख्य वनस्पती या मेळघाटामध्ये पावसाळ्यात तयार होत असतात, अशी माहिती डॉ. उज्वला कोकाटे यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18 , nagpur
  • First Published :
जाहिरात
जाहिरात