फोटोग्राफीवरून उद्धव ठाकरेंची राजकीय टोलेबाजी
प्रमोद पाटील, प्रतिनिधी नवी मुंबई, 29 जुलै : फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडिया आणि भारतीय विद्या भवन यांच्या माध्यमातून 21व्या पीएसाय आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन 2023 चं आयोजन करण्यात आलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं, यावेळी उद्धव ठाकरेंनी टोलेबाजी केली. ‘बऱ्याच दिवसानंतर माहेरची माणसं भेटली. कोणाचा फोटो कोणासोबत आणि कधी येईल सांगता येत नाही, म्हणून मी फोटोग्राफी थांबवली,’ असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरेंचं पहिलं प्रेम, पाहा त्यांच्याच लेन्समधले Photos ‘मी एक्स फोटोग्राफर नाही होणार, वडिलांकडून कलेचा वारसा आहे तो घेणार. कला रक्तात असावी लागते. कलाकृती अनेकांनी विकत घेतली आहे. पाहिजे तर कलाकृतीचं प्रदर्शन करतो आणि कुणाला विकत घ्यायची असेल तर त्यांनी घ्या,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले. ‘माझं स्वप्न होतं, म्हणता म्हणता तीन प्रदर्शनं झाली. सदस्यत्व मनाने दिलं. चेहरा वेगळा असला तरी बॅटिंग तशीच करतात. तुम्ही जे सांगाल ते फोटो देईन. क्षण जात असतात पण क्षण गोठून ठेवण्याचं काम या कलेमध्ये आहे,’ असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
उद्धव ठाकरे अन् फोटोग्राफी फोटोग्राफी हे आपलं पहिलं प्रेम आहे, तो माझ्या जगण्याचा ऑक्सिजन आहे, कोणी काहीही म्हणालं तरी मी फोटोग्राफी सोडणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी याआधीही अनेकवेळा सांगितलं आहे. फोटोग्राफीच्या छंदामुळे उद्धव ठाकरे जवळपास 40 वर्ष राजकारणापासून लांब राहिले. ‘उद्धव ठाकरेंच्या घरगुती मुलाखतीवर…’, फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय