JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिवसेना, हिंदुत्व, सत्ता, राष्ट्रवादी अन् बरंच काही; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीतले 10 मुद्दे

शिवसेना, हिंदुत्व, सत्ता, राष्ट्रवादी अन् बरंच काही; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीतले 10 मुद्दे

मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे देताना राज्य आणि केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. ‘‘2024 साल आपल्या देशाच्या आयुष्याला नवे वळण देईल.’’ असं उद्धव ठाकरे या मुलाखतीत म्हणाले.

जाहिरात

उद्धव ठाकरे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 जुलै : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘आवाज कुणाचा’ या ‘पॉडकास्ट’ माध्यमातून ‘सामना’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे देताना राज्य आणि केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. ‘‘2024 साल आपल्या देशाच्या आयुष्याला नवे वळण देईल.’’ असं उद्धव ठाकरे या मुलाखतीत म्हणाले. तसंच ब्रिटिश साम्राज्यावरचा सूर्यही शेवटी मावळलाच. प्रत्येकाचा शेवट हा होतोच. हा निसर्ग नियम आहे. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स हे तीन पक्षसुद्धा आता ‘एनडीए’त सामील झाले. हीच त्यांची ताकद आहे अशा शब्दात टीका केली.

धनुष्यबाण की मशाल? धनुष्यबाण आणि मशाल या नंतर आलेल्या गोष्टी. पहिली आली ती शिवसेना. ते नाव फार महत्त्वाचं आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनीसुद्धा सांगितलेलं आहे की, शिवसेना हे नाव प्रबोधनकारांनी, माझ्या आजोबांनी दिलेलं आहे.

इर्शाळवाडी दुर्घटना लाजीरवाणी असं का म्हणालात? मी लाजिरवाणं एवढय़ासाठी म्हटलं की, मी इर्शाळवाडीला गेलो असताना त्या गर्दीत एक तरुण मला ओरडून प्रश्न विचारत होता की, ‘आपल्या स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्षे झाली तरी आम्ही हेच आयुष्य जगायचं का?’ आणि हा चटका लावणारा प्रश्न आहे.

राष्ट्रवादीने काय खुपसलं? अजित पवार खरे की…; PM मोदींचा उल्लेख करत ठाकरेंचा सवाल

मोठी दुर्घटना घडली असताना मुख्यमंत्री दिल्ली दरबारी एवढी मोठी दुर्घटना घडलेली असताना मुख्यमंत्री मुजरा मारायला दिल्ली दरबारी गेले आहेत. पहा, फोटो प्रसिद्ध झालेत. कुणाला मुजरा मारताय? कशासाठी मुजरा मारताय? ज्यांना मुजरा मारायला गेला आहात त्यांच्या डबल इंजिन सरकारमध्ये देशात काय चाललंय? राज्यात एवढी मोठी दुर्घटना घडली आहे, आपत्ती ओढवली आहे, दरड कोसळली आहे तरीदेखील हे दिल्ली दरबारी मुजरा मारायला जाताहेत. हे असे हुजरे राज्याला काय न्याय देणार? समृद्धीवर भीषण अपघातानंतर शपथविधी समृद्धी महामार्गावर इतका मोठा अपघात झाला. त्या अपघातातील मृतांच्या चिता धगधगत असताना इथे शपथविधी झालाय. चितांचा धूर विझलेला नसताना मंत्रीपदाच्या शपथा घेतल्या जाता हा विषय खूप गंभीर आहे.

असं म्हटलं जातं की, उद्धव ठाकरेंना सत्ता राबवताच आली नाही? सध्याचं चित्र तुम्ही म्हणताय ते पाहिलं तर या पद्धतीने मी सत्ता राबवू इच्छित नाही आणि माझ्याकडून ती तशी राबवली पण जाणार नाही. जर मला सत्ता टिकवायची असती तर जे गद्दार होते ते गद्दारी करण्यापूर्वी माझ्यासोबतच दोन-तीन दिवस होते. त्यांना हॉटेलमध्ये किंवा इतरत्र डांबून ठेवू शकलो असतो, पण असं किती दिवस डांबून ठेवणार. जी मनानेच विकली गेली आहेत ती माणसं मला नकोच आहेत. वर्षभराचा काळ कसा गेला. असंख्य लोक माझ्यासमोर आहेत. येताहेत. उदंड प्रतिसाद लाभतोय. शिवसेना मजबूत होतीच, पण आता अडीच वर्षात मी जे काही करू शकलो त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानायला लागली. ही माझी कमाई आहे. मोठी कमाई आहे. त्या एका नात्याने शिवसेनेसोबत पूर्वी कधीही नव्हते असे लोकही, अशी जनताही शिवसेनेसोबत जोडली गेली. गद्दारी करणाऱ्यांना मीसुद्धा डांबून ठेवू शकलो असतो पण…; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं देवेंद्र फडणवीस म्हणताहेत की, उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला… ठीक आहे. मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं, की ज्यामुळे तुम्ही राष्ट्रवादी फोडलीत. शिवसेनेने खंजीर खुपसला, मी खंजीर खुपसला म्हणताय, मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं की तुम्ही त्यांना पण फोडलंत? तुमचं सरकार आलं होतं ना, शिवसेना फोडून. शिवाय अपक्षही सोबत घेऊन तुमचं सरकार मजबूत झाल्यानंतरही पुन्हा राष्ट्रवादी का फोडलीत? हे सरकार स्थिर आहे का? स्थिर कोणत्या दृष्टीने. जर तुम्हाला बारीक सारीक गोष्टींसाठी दिल्लीत येरझारा घालाव्या लागत असतील तर इथे सरकार असले काय नसले काय? फरक काय पडतो? बरं, देशाची स्थिती काय आहे आज. डबल इंजिनचा बोजवारा उडाला आहे. दोन्ही इंजिन फेल गेलेत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी, तुम्ही दोघांपैकी कोणाला शुभेच्छा दिल्या? मी सकाळीच इर्शाळवाडीला गेलो. त्यामुळे त्यांना फोन करता आला नाही, पण शुभेच्छा देईनच आणि शुभेच्छा देताना हेच सांगेन की, या शुभेच्छा केवळ माझ्या नाहीत तर तमाम जनतेच्या म्हणून देतोय. त्या तुम्ही सत्कारणी लावा. तुम्ही हिंदुत्वावर किती ठाम आहात! पहिली गोष्ट, मी माझ्या हिंदुत्वाची एक चौकट, जी माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी दिलेली आहे, ती चौकट मी सांगितलेली आहे. या देशावर जो प्रेम करतो, जो देशासाठी मरायला तयार आहे तो हिंदू आणि आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे किंवा देवळात घंटा बडवणाऱ्यांचे हिंदुत्व नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या