JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / संसदभवनातील शिवसेना कार्यालयातून उद्धव ठाकरेंचा फोटो हटवला, शिंदे गटाकडून आणखी एक धक्का

संसदभवनातील शिवसेना कार्यालयातून उद्धव ठाकरेंचा फोटो हटवला, शिंदे गटाकडून आणखी एक धक्का

धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर आता शिंदे गटाकडून संसद भवनातील शिवसेनेच्या कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे याचे फोटो देखील हटविण्यात आले आहेत.

जाहिरात

शिवसेना कार्यालयातून उद्धव ठाकरेंचा फोटो हटवला

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 28 फेब्रुवारी : निवडणूक आयोगानं धनुष्यणबाण  चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिल्यानंतर शिंदे गटात उत्साहाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या अडचणी मात्र आणखी वाढल्याचं पहायला मिळतय. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर आता शिंदे गटाकडून संसद भवनातील शिवसेनेच्या कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे याचे फोटो देखील हटविण्यात आले आहेत. संसद भवनातील तिसऱ्या मजल्यावर शिवसेनेचं हे कार्यालय आहे.      फोटे हटवले  शिंदे गटाने आणखी एक मोठा धक्का ठाकरे गटाला दिला आहे. निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव मिळताच शिंदे गटाकडून संसद भवनात असलेल्या शिवसेनेच्या कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवण्यात आले आहेत. आता तिथे फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो ठेवण्यात आले आहेत. मात्र अद्याप यावर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये.

विधान परिषदेतही कोंडी  दुसरीकडे राज्यात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेश सुरू आहे. या अधिवेशनामध्ये आता विधान परिषदेमध्ये देखील प्रतोद नेमण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर उपसभापती निलम गोऱ्हे यांना पत्र देखील पाठवण्यात आलं आहे. शिंदे गटाचा प्रतोद झाल्यास त्याचा व्हीप शिवसेनेच्या सर्वच आमदारांना लागू होणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे आमदार व्हीप पालन करणार की नाही हे पहाणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या