'मतदारांनी ठरवलं आम्हाला संपवायचं तरच आम्ही संपू. त्यांनी ठरवलं जिवंत ठेवायचं तर आम्ही जिवंत राहू. अमित शहा नावाचा कोणी देव नाही.
चिपळूण, 25 फेब्रुवारी : ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पण, ठाकरे यांना फार कळालं. 10 व्या सुचीवर निकाल दिला पाहिजे होता, पण पक्षाच्या अंतर्गत भांडणाचा निकाल दिला आहे. कोर्ट म्हणालं की, आम्ही काहीच करू शकत नाही, कोर्टाचं हे चुकीचं विधान आहे, असं म्हणत वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर टीका केली. चिपळूण मधील रामपूरमध्ये वंचित बहुजन आघाडी आयोजित कुणबी समाज उन्नती परिषद पार पडली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी परखड भाष्य केलं.
‘ठाकरे यांना फार उशिरा कळालं. 10 व्या सुचीवर निकाल दिला पाहिजे होता, पण पक्षाच्या अंतर्गत भांडणाचा निकाल दिला आहे. कोर्ट म्हणालं की, आम्ही काहीच करू शकत नाही, कोर्टाचं हे चुकीचं विधान आहे. सरन्यायाधीश हे निवडणूक आयोगाचा निकाल चूक आहे की बरोबर आहे, हे तपासू शकतं. आणि निवडणूक आयोग हे कोर्ट आहे का? हे सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा तपासायला हवं, असं म्हणत वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेवर टीका केली. (Kasba bypoll election : कसब्यात कुणी वाटले पैसे? मविआचे उमेदवार धंगेकरांचं उपोषण अखेर मागे) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्यातील भेट नक्की कोणत्या कारणामुळे आहे ते मला माहित नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणार नाही, अशी प्रतिक्रिया केजरिवाल यांच्या भेटीवर प्रकाश आंबेडकर यांनी दिली. ‘केवळ शहराचे नाव बदलून काही होत नाही, हाय कोर्टाच्या नावाने शहराला ओळखले जाते. त्यामुळे जेव्हा कोर्टाचे नाव बदलेल तेव्हा मानेन, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी नामांतरावर दिली. (देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटामुळे संजय राऊत क्लिन बोल्ड, म्हणाले…) ‘मतदारांनी ठरवलं आम्हाला संपवायचं तरच आम्ही संपू. त्यांनी ठरवलं जिवंत ठेवायचं तर आम्ही जिवंत राहू. अमित शहा नावाचा कोणी देव नाही. शिवसेनेला जे मदत करतील त्यांना आम्ही संपवू या अमित शहा यांच्या विधानावर वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी पलटवार केला. यावेळी खोतकी, कुळकायदा या विषयावर देखील त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, कोकणात ब्रिटीशांनी खोतकी सुरू केली होती. त्याबदल्यात त्या खोताला अडीच एकर जागा देऊन उर्वरित जागेचा शेतसारा जमा करण्याचे काम त्याला दिले जात असतं. असे सांगत खोतकी आणि कूळ कायद्याच्या प्रश्नाचा कायमचा निपटारा करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातून किमान पाच कुणबी प्रतिनिधींनी आपल्या सोबत यावे. असं आवाहन करत हा प्रश्न कायम कसा निकाली निघेल यासाठी आपण मार्गदर्शन करू असे त्यांनी म्हटलं आहे.