मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Kasba bypoll election : कसब्यात कुणी वाटले पैसे? मविआचे उमेदवार धंगेकरांचं उपोषण अखेर मागे

Kasba bypoll election : कसब्यात कुणी वाटले पैसे? मविआचे उमेदवार धंगेकरांचं उपोषण अखेर मागे

कसबा मतदारसंघामध्ये पैसे वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप धंगेकर यांनी केली आहे

कसबा मतदारसंघामध्ये पैसे वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप धंगेकर यांनी केली आहे

कसबा मतदारसंघामध्ये पैसे वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप धंगेकर यांनी केली आहे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 25 फेब्रुवारी : कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचार तोफा आता थंडावल्या आहे. पण प्रचार थांबल्यानंतर नोटांचं वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला असून त्यासाठी उपोषणही केलं. अखेर पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर धंगेकरांनी उपोषण मागे घेतलं.

कसबा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर सुरू आहे. पण, कसबा मतदारसंघामध्ये पैसे वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप धंगेकर यांनी केली आहे.

आज सकाळी ते उपोषण बसणार असं जाहीर केलं होतं. सुरुवातील पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली होती. पण धंगेकर उपोषणावर ठाम होते, अखेर पोलिसांनी धंगेकरांना पैसे वाटण्यावर कारवाई करणार, असं आश्वासन दिलं त्यानंतर धंगेकरांनी आपलं उपोषण मागे घेतलं.

(देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटामुळे संजय राऊत क्लिन बोल्ड, म्हणाले...)

दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यामुळे पराभूत मानसिकतेतून ते भाजपवर मतदारांना पैसे वाटल्याचा बेछूट आरोप करीत आहेत. हा कसबा विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा अपमान आहे,

तो मतदार कधीही सहन करणार नाही तसेच निवडणुकीतील पराभवाची कारणे धंगेकर यांनी आतापासून शोधण्यास सुरुवात सुरुवात केली आहे. कसबा मतदारसंघातील मतदार मतपेटी द्वारे चोख उत्तर देतील,असा पलटवार आमदार माधुरी मिसळ यांनी केला.

काय आहे रवींद्र धंगेकरांचा आरोप?

गेल्या दोन दिवसांमध्ये पोलिसांच्या उपस्थितीमध्ये सगळे कार्यकर्ते हे पैसे वाटप करत आहे. या मध्ये भाजप आणि शिंदे गटाचे नेते आहे. कसबा पेठ, दत्तवाडी, गंजपेठ या भागात पैसे वाटप सुरू आहे. रात्री पोलिसांच्या उपस्थितीत लोकांना पैसे वाटले जात आहे. पैसे वाटप करणे हा प्रकार लोकशाहीची हत्या आहे. निवडणूक आयोगाला वारंवार तक्रार दिली पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. धनशक्तीचा वापर केला जात आहे. आमच्या कार्यकर्त्यांना दमबाजी केली जात आहे. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठेवले जात आहे.

First published:
top videos