JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Solapur News : आधी पत्नीचा सत्तूरने गळा चिरला; नंतर पतीचं धक्कादायक पाऊल, सोलापूर हादरलं

Solapur News : आधी पत्नीचा सत्तूरने गळा चिरला; नंतर पतीचं धक्कादायक पाऊल, सोलापूर हादरलं

सोलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बातमीनं खळबळ उडाली आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक छायाचित्र

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सोलापूर, 31 मे :  सोलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीने पत्नीची धारदार चाकूनं हत्या केली, नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकारानं परिसरात खळबळ उडाली आहे. पतीनं हे कृत्य का केलं याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये, मात्र कौटुंबीक वादातून हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. पतीची आत्महत्या    घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. पतीने आधी पत्नीचा सत्तुरने गळा कापून खून केला. नंतर त्याने घराशेजारी असणाऱ्या झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली. लाडलेसब हुसेनी नदाफ( वय वर्षे 65) असे पत्नीची हत्या करणार्‍या पतीचे नांव असून, नगुमा लाडलेसब नदाफ (वय वर्षे 63) असे मृत पत्नीचं नाव आहे. कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा  प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Crime News : मटणासाठी मित्रानेच मित्राला संपवलं; छ. संभाजीनगरातील धक्कादायक प्रकारानं खळबळ

संबंधित बातम्या

पोलीस घटनास्थळी दाखल  दरम्यान घटनेची माहिती मिळताच  मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या