"कोण रोहित पवार? ही त्यांची पहिली टर्म आहे. काही दिवस जाऊ द्या त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल"
प्रितम पंडित, प्रतिनिधी सोलापूर. 10 फेब्रुवारी : लोकसभा आणि विधानसभा निवडणूक अजून दूर आहे. पण, सोलापूरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आताच शाब्दिक युद्ध पेटले आहे. “कोण रोहित पवार? ही त्यांची पहिली टर्म आहे काहीजणांमध्ये पोरकटपणा असतो” असं म्हणत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी रोहित पवारांना सुनावलं. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे सोलापूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सोलापूर लोकसभेबद्दल वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत प्रणिती शिंदेंनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली. “कोण रोहित पवार? ही त्यांची पहिली टर्म आहे काहीजणांमध्ये पोरकटपणा असतो. काही दिवस जाऊ द्या त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल” असं म्हणत प्रणिती शिंदेंनी कडक शब्दांत उत्तर दिलं. ( आता अयोध्येला याच, राज ठाकरेंना पुन्हा खास निमंत्रण ) तसंच, महाविकास आघाडीतील नेत्यांवर शाब्दिक आणि आता शारिरीक हल्ले होत आहेत त्याचा आम्ही निषेध करतो. सरकार या हल्ल्यांकडे गांभीर्याने पाहत नाही. महिला आमदारांवर हल्ले होतात, ती ही एकटे असताना त्या मागचे कारण शोधले पाहिजे. महिला आमदारांवर असे हल्ले होत असतील तर सर्वसामान्यांचे काय? असा सवालही शिंदेंनी उपस्थितीत केला. -राहुल गांधींनी वस्तुस्थितीवर भाषण संसदेत केले आहे. मोदी यांनी याबाबत उत्तर देणे त्यांचे कर्तव्य आहे. ते या सगळ्यानंतर इन्सिक्यूर झाले आहे. आतापर्यंत त्यांना कधी चिडलेल पाहिलेलं नाही. मात्र राहुल गांधीच्या भाषणानंतर ते अनस्टेबल झाले आहे. त्यांच्यावर किती परिणाम झालेत हे यातून दिसत आहे, अशी टीकाही शिंदेंनी मोदी सरकारवर केली. (..तर कदाचित सरकार वाचले असते, राष्ट्रवादीनेही फोडले पटोलेंवर खापर) ‘12 तारखेला हात से हात जोडो या अभियानासंदर्भात बैठकीसाठी काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील हे मुंबईमध्ये येणार आहेत. त्या बैठकीत या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा होण्याची शक्यता आहे. पण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही. बाळासाहेब थोरात यांच्या राजीनामाच्या मुद्द्यावर देखील एच के पाटील यांच्या बैठकीतच चर्चा होईल, असं शिंदे म्हणाल्या. काय म्हणाले होते रोहित पवार? “लोकसभा सीट कोणी लढवायाची या संदर्भात महाविकास आघाडीची बैठक येत्या महिन्या दोन महिन्यात होईल असा माझा अंदाज आहे. सोलापूरची जागा काँग्रेसकडेच राहिलं की राष्ट्रवादीने लढवायची हे देखील त्याच बैठकीत ठरेल” असं विधान आमदार रोहित पवार यांनी केलं होतं.