मुंबई, 10 जानेवारी : नाना पटोले जर विधानसभेचे अध्यक्ष असते तर चित्र वेगळं असतं, पटोले यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार कोसळले नसते. पटोलेंच्या राजीनाम्यानंतर सत्ताधाऱ्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीला विलंब लावला असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यानंतर आता राष्ट्रवादीने देखील संजय राऊत यांच्या सुरात सूर मिसळला आहे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देताना कोणाला विश्वासात घेतलं नाही, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. छगन भुजबळ यांनी नेमकं काय म्हटलं? नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देताना कोणाला विश्वासात घेतलं नाही. पटोलेंच्या राजीनाम्यानंतर दुसरा अध्यक्ष होऊ शकला नाही. नंतर सरकार कोसळलं, नाना पटोले जर अध्यक्ष असते तर कदाचित इतर घटना घडल्या नसत्या. पटोले यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार वाचण्याची शक्यता होती असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून देखील भुजबळ यांनी भाजपला टोला लगावला आहे. हेही वाचा : Kasba by-election : पुण्यात भाजपला काटे की टक्कर; ‘मविआ’च्या प्रचाराचं मास्टर प्लानिंग समोर भाजपला टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबईमध्ये येत आहेत. अमित शाह हे पुण्यात येणार आहेत. चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्र आणि मुंबई देशाच्या तिजोरीत भर घालते त्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागला. या निकालापासून भाजपकडून महाराष्ट्रात अधिक लक्ष दिलं जात असल्याचा टोला छगन भुजबळ यांनी लगावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.