जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / आता अयोध्येला याच, राज ठाकरेंना पुन्हा खास निमंत्रण

आता अयोध्येला याच, राज ठाकरेंना पुन्हा खास निमंत्रण


अयोध्येतील जुना आखाड्याच्या गुरु मॉं कांचनगिरी आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांची भेट घेतील.

अयोध्येतील जुना आखाड्याच्या गुरु मॉं कांचनगिरी आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांची भेट घेतील.

अयोध्येतील जुना आखाड्याच्या गुरु मॉं कांचनगिरी आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांची भेट घेतील.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 फेब्रुवारी : हिंदुत्वाच्या मुद्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहे. मध्यंतरी राज ठाकरे अयोध्येला जाणार होते. पण, भाजप खासदार ब्रृजभूषण यांनी विरोध केल्यामुळे दौरा रद्द करावा लागला होता. पण, आता कांचनगिरी माँ यांनी राज यांना अयोध्येच खास निमंत्रण दिले आहे. अयोध्येतील जुना आखाड्याच्या गुरु मॉं कांचनगिरी आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये गुरु मॉं कांचनगिरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. गेल्या भेटीवेळी त्यांनी राज ठाकरेंना अयोध्येत येण्याचे आमंत्रण दिले होते. आज पुन्हा एकदा त्यांनी निमंत्रण दिलं आहे. राज ठाकरे यांचा शस्त्रक्रिया झाली होती त्यांची प्रकृती उत्तम राहावी. अयोध्येस राज ठाकरे लवकर जातील. प्रभु राम सर्वांचे त्यांना आता कोणतीही अडचण नाही. आज निमंत्रण दिले आहे आता कोणतीही बाधा येणार नाही . राज ठाकरे कमजोर नाहीत मी प्रत्येक वेळी त्यांच्या बाजूने असेन, असं म्हणत कांचनगिरी यांनी राज यांनी आमंत्रण दिले. (‘पंतप्रधान मोदी मुंबईत मुक्कामी राहू शकतात’, संजय राऊतांचा खोचक टोला) देशातील मुलींचे ३५ तुकडे केले जात आहे. हिंदू विचारसरणीचे लोक एकत्र आले पाहिजे हिंदू राष्ट्र हा विचार असणे गरजेचा आहे. लवकरच अयोध्येबाबत कल्पना दिली जाईल. काही विरोध स्वतःला प्रसिद्धीसाठी समोर आले होते. पण आता त्यांचा विरोध मावळला आहे, असं म्हणत कांचनगिरी माँ यांनी ब्रृजभूषण सिंह यांना टोला लगावला. हिंदू राष्ट्र झाले पाहिजे. राज ठाकरेंनी अजानला विरोध केला मुघल विचारधारावाला अजान सुरू आहेत. व्हेलेन्टाईन डे पाश्चिमात देशातील आहे. गाईला गळाभेट करणे ही गर्वाची गोष्टी आहे. जे विरोध करत आहेत ते मुघल विचारधारेचे आहे, असंही कांचनगिरी माँ म्हणाल्या. (‘मविआ’मधील आमदार फुटीच्या दाव्यावर जयंत पाटलांची सावध भूमिका म्हणाले…) तर, अयोध्या दौरा नक्कीच करणार आहोत. मागे या दौऱ्याचे राजकारण झाले आता हा दौरा नक्कीच होईल. आता निवडणुका येत आहेत हिंदी भाषिकांमध्ये जो गैरसमज आहे तो गुरु माँ दूर करणार आहेत निवडणुक मुळे हे सर्व थांबले आहे, अशी माहिती शिरीष सावंत यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात