JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कार्यक्रम पाहून सायकलवरून घरी निघाला, मात्र वाटेतच तरुणाला मृत्यूने गाठलं, नेमकं काय घडलं?

कार्यक्रम पाहून सायकलवरून घरी निघाला, मात्र वाटेतच तरुणाला मृत्यूने गाठलं, नेमकं काय घडलं?

दिवसभरात अनेक अपघात घडतात. त्यामुळे कधी, कुठे, कसा, अपघात होईल सांगता येत नाही. दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे.

जाहिरात

भीषण अपघात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रमोद पाटील, पनवेल,25 जुलै : दिवसभरात अनेक अपघात घडतात. त्यामुळे कधी, कुठे, कसा, अपघात होईल सांगता येत नाही. दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. एकापेक्षा एक भीषण अपघात घडतात आणि त्याचे फोटो, व्हिडीओ समोर येत असतात. अशा अपघातांमध्ये अनेक वेळा लोक गंभीर जखमी होतात तर काहींना आपला जीवही गमवावा लागतो. अशातच आणखी एक अपघाताची घटना समोर आली आहे ज्यामध्ये एका 19 वर्षीव तरुणाचा मृत्यू झाला. पनवेल तालुक्यातील वावंजे येथे हा भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. येथील सोना चांदी कंपनीच्या गेटवर छोटा हत्ती टेम्पोने सायकल वरून जाणाऱ्या 19 वर्षीय तरुणास धडक दिली. या धडकेत आकाश पाटील याचा जागीच मृत्यू झाला. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात आरोपी लहू गोंधळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी लहू गोंधळी यांनी दारूच्या नशेत छोटा हत्ती चालवला. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून टेम्पो चालवत त्यांनी आकाशला धडक दिली. ढोंगऱ्याचा पाडा या गावातील कार्यक्रम पाहून सायकलवरून घरी जाणाऱ्या आकाश पाटील याला पाठीमागून धडक दिली. या धडकेत आकाश पाटील याचा मृत्यू झाला. आकाश पाटीलच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगरच कोसळला आहे. राज्यातील विदारक दृश्य, बाईकवर खाट अडकवून निघाली अत्यंयात्रा; तरुणाच्या मृत्यूमुळे गाव हळहळलं! दरम्यान, गाडी चालवताना ड्रिंकचं सेवन करु नये, हेल्मेट वापरावं, सतर्कता बाळगावी, अशा सूचना वारंवार सांगूनही काही लोक याकडे दुर्लक्ष करतात. ज्यामुळे असे भीषण अपघात घडतात. अपघातात काही वेळा चुकी नसलेल्या लोकांनाही आपला जीव गमवावा लागतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या