JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Thackeray Vs Shinde : ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी अयोध्या पौळ यांना शाईफेक करत मारहाण; सापळा रचून हल्ला केल्याचा आरोप

Thackeray Vs Shinde : ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी अयोध्या पौळ यांना शाईफेक करत मारहाण; सापळा रचून हल्ला केल्याचा आरोप

Thackeray Vs Shinde : शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांच्यावर कळव्यात शाई फेक करण्यात आल्याची घटना घडली आहे.

जाहिरात

अयोध्या पौळ यांना शाईफेक करत मारहाण

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अजित मांढरे, प्रतिनिधी ठाणे, 16 जून : ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमनेसामने आल्याची घटना घडली आहे. ठाकरे गटातील महिला पदाधिकारी आयोध्या पौळ यांना शाई फेक करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या पदाधिकारी रोशनी दीपक शिंदे यांना मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा अशीच घटना घडल्याने ठाकरे आणि शिंदे गटाचा वाद वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

काय आहे प्रकरण? शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर कळव्यात शाई फेक करत मारहाण केल्याचा आरोप पोळ यांनी केला आहे. कळवा मनीषा नगर, जय भीम नगर भागात अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आला होता. सर्व महापुरुष यांच्या फोटोला हार घालत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला शेवटी हार का घातला? म्हणून स्थानिक महिलांनी पौळ यांच्यावर शाइ फेकत मारहाण करत अंगावर मोठ्या संख्येने धावून आल्या. ठाकरे गटाचा कार्यक्रम म्हणून आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, ठाकरे गटाचा कार्यक्रम नसून ट्रॅप रचण्यात आला असल्याचे स्थानिक ठाकरे गटातील महिला पदाधिकारी यांनी सांगितले. तसेच सुषमा अंधारे आणि खासदार राजन विचारे, ठाकरे गट आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष केदार दिघे देखील या कार्यक्रमास येणार असल्याचे भासवून पोळ यांना आमंत्रित केले असल्याचे महिला पदाधिकारी यांनी तोंडी सांगितले. वाचा - ‘ये फेव्हिकॉल का जोड है…’ म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी फडणवीसांच्या मैत्रीबद्दल स्पष्टच सांगितलं महिलेवर शाई फेकणारे कोण? याबाबत पोलिसांनी माहिती दिली नाही. तसेच महिलेची तक्रार पोलिसांनी घेतली की नाही याबाबत पोलिसांनी माहिती दिली नाही. यापूर्वीही असाच हल्ला काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या पत्नी विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या पदाधिकारी रोशनी दीपक शिंदे यांना मारहाण करण्यात आली होती. रोशनी दीपक शिंदे काम करत असलेल्या कंपनीत घुसून शिंदे गटाच्या जवळपास 15 महिला पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. हा मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या