जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'ये फेव्हिकॉल का जोड है...' म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी फडणवीसांच्या मैत्रीबद्दल स्पष्टच सांगितलं

'ये फेव्हिकॉल का जोड है...' म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी फडणवीसांच्या मैत्रीबद्दल स्पष्टच सांगितलं

(मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

(मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

‘काही लोक म्हणतात जय विरूची जोडी आहे. धर्मवीरची जोडी आहे. मी एवढंच सांगतो, ही युतीची जोडी आहे, सत्तेच्या स्वार्थासाठी झाली नाही.

  • -MIN READ Palghar,Thane,Maharashtra
  • Last Updated :

राहुल पाटील, प्रतिनिधी पालघर, 16 जून : ‘देवेंद्रजी आणि माझं बॉण्डिंग मजबूत आहे. त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केले तरी आमची दोस्ती तुटणार नाही. ये फेव्हिकॉल का जोड है तुटेंगा नही’ असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा जाहिरात वादावरून विरोधकांना टोला लगावला आहे. भाजप-शिवसेनेतील जाहिरातीचा वाद शमला असला तरी विरोधकांची टीकेची झोड मात्र कमी होत नाही. पालघरच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मैत्रीच्या आणाभाका घेतल्या. पण, विरोधक मात्र बेडूक-हत्ती टीकेची आठवण काढत, सत्ताधाऱ्यांना चिमटे काढत आहे. त्यांच्या या टीकेला आज मुख्यमंत्री शिंदे यांनी जशास तसे उत्तर दिलं. (अजित पवारांचा कट्टर समर्थक एकनाथ शिंदेंच्या गळाला? मुख्यमंत्र्यांनी घेतली अण्णा बनसोडेंची भेट) आमच्या युतीमध्ये मिठाचा खडा टाकला होता, पण तो खडा आम्ही बाजूला काढून टाकला आहे. पुन्हा भक्कम युती झाली आहे. पुन्हा लोकांच्या मनातलं भक्कम सरकार स्थापन केलं आहे. खऱ्या अर्थाने लोकांच्या मनातलं सरकार स्थापन केलं. पण तरीही आमच्यामध्ये काही होत नाही म्हणून देवेंद्रजी आणि माझी मैत्री आताची नाही. ते आमदार होते मी आमदार होतो, तेव्हापासून आमची मैत्री होती. जीवाभावाची आमची मैत्री आहे. ‘देवेंद्रजी आणि माझं बॉण्डिंग मजबूत आहे. त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केले तरी आमची दोस्ती तुटणार नाही. ये फेव्हिकॉल का जोड है तुटेंगा नही’, असं शिंदेंनी ठणकावून सांगितलं. ( अजितदादांची सर्व लवाजमा सोडून छुपी भेट; ‘तो’ कारखाना पुन्हा चर्चेत; भाजप म्हणाले. .) ‘काही लोक म्हणतात जय विरूची जोडी आहे. धर्मवीरची जोडी आहे. मी एवढंच सांगतो, ही युतीची जोडी आहे, सत्तेच्या स्वार्थासाठी झाली नाही. जे स्वार्थासाठी एकत्र झाले होते, त्यांना या जनतेनंच बाजूला केलं आहे, असा टोलाही शिंदेंनी मविआला लगावला. या राज्याचे प्रकल्प आपण पुढे नेत आहोत. एवढ्या कमी काळात काम होत आहे. शासनाचे काम पाहून विरोधकांना धडकी भरली आहे. टाळी आपल्या युतीची झाली आहे. ही युती स्वार्थासाठी झाली नाही, ही युती सत्तेसाठी झाली नाही. गेल्या 25 वर्षांपासून ही युती झाली आहे. बाळासाहेबांचे विचार, गोपीनाथ मुंडे यांच्या विचाराने युती झाली होती, असंही शिंदे म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात