JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Satara News : जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतला अन् कुटुंब उद्ध्वस्त, 15 मिनिटांच्या अंतराने वडील-मुलाचा मृत्यू

Satara News : जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतला अन् कुटुंब उद्ध्वस्त, 15 मिनिटांच्या अंतराने वडील-मुलाचा मृत्यू

जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेणं वडील आणि मुलाच्या जीवावर बेतलं. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

जाहिरात

जेवणानंतर औषध घेतलं आणि घात झाला

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सातारा : रात्री कुटुंबासोबत जेवण सुखासमाधानानं झालं आणि औषध घेऊन जे झोपले ते पुन्हा उठलेच नाहीत. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही धक्कादायक घटना साताऱ्यातील फलटण शहरात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फलटण शहरातील हणमंतराव पोतेकर आणि अमित पोतेकर या वडील आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे फलटण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दोघांच्या मृत्यूचं नेमके कारण समजू शकलेले नाही. हनुमंतराव रामभाऊ पोतेकर आणि त्यांचा एकुलता एक मुलगा अमित पोतेकर यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. वडील हनुमंतराव आणि त्यांच्या मुलाने कुटुंबासमवेत जेवण केलं, त्यानंतर आयुर्वेदिक काढा सर्वांनी घेतला. मध्यरात्रीच्या सुमारास हनुमंतराव ,मुलगा अमित आणि त्यांची मुलगी या तिघांना त्रास होऊ लागला. त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात तातडीनं उपचारासाठी दाखल केलं.

‘मुंबै लै आवडती पण सातारा म्हंजी काळजाचा …’ किरण माने यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष

पहाटे हनुमंतराव पोतेकर आणि त्यानंतर पंधरा मिनिटांनी अमित पोतेकर यांचं निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या मुलीची तब्येत सुधारली असून नक्की मृत्यू कशामुळे झाला याचे कारण समजू शकलेले नाही. विषबाधेमुळे मृत्यू झाला की अन्य कोणत्या कारणामुळे झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. या पिता पूत्रांच्या आकस्मित मृत्यूने संपूर्ण फलटण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Satara News : ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून घरी येताना घडलं धक्कादायक; 4 महिलांचा जागीच मृत्यू

संबंधित बातम्या

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असून पुढील तपास ते करत आहेत. मात्र कोणत्याही प्रकरचं औषध घेताना तुम्ही डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याने घ्यावं नाहीतर नुकसान होऊ शकतं. वडील आणि मुलाचा मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच समजू शकतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या