सातारा : कारंडवाडी येथे शेतातील कामे आटपून ट्रॉलीतून घरी निघालेल्या महिलांची ट्रॅक्टर ट्रॉली कॅनालमध्ये पलटी झाल्याने मोठा अपघात घडला.
ट्रॉलीमधील पाच महिलांपैकी 4 महिलांचा पाण्यात ट्रॉली खाली अडकून जागीच मृत्यू झाला. कॅनॉलवरील अरुंद पुलावरून जात असताना ही घटना घडली.
अपघातात एक महिला आणि ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाले आहेत. कारंडवाडी येथे आज संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली.
अलका भरत माने (वय 55), अरुणा शंकर साळुंखे (वय 58), सीताबाई निवृत्ती साळुंखे (वय 65), लिलाबाई शिवाजी साळुंखे (वय 60) (सर्व राहणार कारंडवाडी) अशी मृत महिलांची नावे आहेत.