JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'निवडणूक आयोग भोस..' संजय राऊत निवडणूक आयोगावर घसरले; म्हणाले 50 वर्षांपूर्वी..

'निवडणूक आयोग भोस..' संजय राऊत निवडणूक आयोगावर घसरले; म्हणाले 50 वर्षांपूर्वी..

खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर बोलताना शिवराळ भाषेचा वापर केला.

जाहिरात

संजय राऊत निवडणूक आयोगावर घसरले

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

आसिफ मुरसल, सांगली सांगली, 3 मार्च : शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची निवडणूक आयोगावर बोलताना जीभ घसरली आहे. थेट निवडणूक आयोगाचा बाप काढत राऊत यांनी निवडणूक आयोगाला शिवी दिली. तसेच शिवसेना ही निवडणूक आयोगाने निर्माण केली आहे का? असा संतप्त सवाल करत आपल्या असंसदीय शब्द जरी असले तर तो आपला संताप आहे, असं स्पष्ट केलं. ते सांगलीच्या शिवसैनिकांच्या मेळाव्यामध्ये बोलत होते. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा शिवसैनिकांचा मेळावा आज सांगलीमध्ये पार पडला आहे. या मेळाव्यामध्ये बोलताना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे. ही टीका करताना राऊत यांनी निवडणूक आयोगाला शिव्या घातल्या आहेत. ज्यांना जनतेने आणि शिवसैनिकांनी निवडून दिलं ते आज इथेच आहेत. आणि ते 50 खोके घेऊन पळून गेले आणि निवडणूक आयोग सांगतोय शिवसेना त्यांची. शिवसेना तुझ्या बापाची आहे का? असा प्रश्न विचारत राऊत यांनी शिवराळ भाषेचा वापर केला. शिवसेना ही काय निवडणूक आयोगाने निर्माण केली आहे का? असा सवाल करत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. 50-55 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली, असेही राऊत म्हणाले. वाचा - राहुल गांधींनी मोदी सरकारच्या दोन योजनांचं केंब्रिज युनिव्हर्सिटीत केलं कौतुक दरम्यान यावरून पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना निवडणूक आयोगाबाबत वापरण्यात आलेल्या शिवराळ भाषेबाबत विचारलं असता त्यांनी त्या शब्दांवर ठाम भूमिका घेत मग होऊ दे ना ट्रोल, अख्खा महाराष्ट्र शिव्या घालतोय, असं स्पष्टीकरण दिले आहे. संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला अपशब्द तर या 40 चोरांना  गद्दार हा शब्द पुसता येणार नाही, असंही ते पुढे म्हणाले.

आम्ही शिवसैनिकांनी यांना निवडून दिले. आमदार, खासदार, मुख्यमंत्री केले आणि ज्यांना निवडून दिले ते 50 खोके घेऊन पळून गेले. पण निवडणूक आयोगाला सांगतोय शिवसेना आमची आहे. या 40 चोरांना गद्दार हा शब्द पुसता येणार नाही. तुम्ही अमिताभचा पिक्चर दिवार पाहिला असेल त्यांनी हातावर मेरा बाप चोर है तसं लिहिले होते. तसेच त्यांच्या घरातल्या सदस्यांनी आपल्या भिंतीवर आणि कपाळावर लिहावं लागेल, असेही राऊत म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या