केंब्रिज, 03 मार्च : काँग्रेस नेते राहुल गांधी हे सातत्याने मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करतात. गेल्या ९ वर्षांपासून केंद्रातील मोदी सरकारवर राहुल गांधींकडून टीका केली जाते. मात्र सध्या केंब्रिज युनिव्हर्सिटीत असलेल्या राहुल गांधींवर मोदी सरकारच्या दोन योजनांचं कौतुक केलं आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं की, मोदी सरकारच्या दोन योजना चांगल्या आहेत.
केंब्रिज विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधींना काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यात मोदी सरकारच्या अशा दोन योजना ज्यामुळे लोकांचा फायदा झाला याबाबतही विचारले होते. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, महिलांना गॅस सिलिंडर देणं आणि लोकांचे बँक खाते उघडणं ही चांगली गोष्ट आहे. राहुल गांधी यांनी उज्ज्वला योजना आणि पीएम जन धन योजना यांचे कौतुक केले. पण त्यानंतर टीकाही केली.
शांततेच्या नोबेल पुरस्कार विजेत्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, काय होते आरोप?
राहुल गांधी म्हणाले की,'माझ्या मते पंतप्रधान मोदी भारताची वास्तुकला संपुष्टात आणत आहेत. त्यामुळे दोन तीन चांगल्या योजनांमुळे चिंतीत नाही. पण ते त्यांचे विचार देशावर लादत आहेत.' पीएम जन धन योजनेंतर्गत केंद्र सरकारने देशात ३० कोटींहून अधिक बँक खाती उघडली होती. तर उज्ज्वला योजनेंतर्गत ११ लाख महिलांना एलपीजी कनेक्शन दिलं.
पेगासस मुद्यावरून पुन्हा आरोप
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी पेगासस बद्दल पुन्हा एकदा दावा करताना म्हटलं की, गुप्तचर अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं होतं की फोनवरून बोलताना सावध रहा कारण त्यांचे बोलणे रेकॉर्ड केले जात आहे. राहुल गांधींच्या या दाव्यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी निशाणा साधताना म्हटलं की, सतत निवडणुकीत पराभव झाल्यानं आता ते परदेशात भारताची प्रतिमा बिघडवत आहेत. तसंच पेगासस चौकशीचा तपास करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या समितीकडे फोन सोपवण्यापासून राहुल गांधींना कोणी रोखलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Modi Government, Narendra Modi, Rahul gandhi