JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sangli News : शेतकऱ्याच्या जिद्दीची कमाल, ओसाड जमिनीतून करतोय लाखोंची कमाई, पाहा Video

Sangli News : शेतकऱ्याच्या जिद्दीची कमाल, ओसाड जमिनीतून करतोय लाखोंची कमाई, पाहा Video

Sangli News : कल्पकता, चिकाटी आणि प्रयत्नांच्या जोरावर ओसाड जमिनीमधूनही लाखोंचं उत्पादन घेता येतं हे सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यानं दाखवून दिलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 30 मार्च : ओसाड जमीन ही शेतीसाठी अयोग्य समजली जाते. पण, अनेकदा शेतकरी या जमिनीचा अभ्यास करुन त्यावर पिकांची लागवड करतात. कल्पकता, चिकाटी आणि प्रयत्नांच्या जोरावर ओसाड जमिनीमधूनही लाखोंचं उत्पादन घेता येतं हे सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यानं दाखवून दिलं आहे. सांगली जिल्ह्यातील कामेरी येथील शेतकरी विनायक वसंतराव पाटील यांनी ओसाड माळावर 25 प्रकारच्या दोनशेहून जास्त फळझाडांची लागवड करुन मळा फुलविला आहे. या माध्यमातून त्यांना वर्षाला अडीच ते तीन लाखांचं उत्पन्न मिळत आहे. 70 रु. किलो, वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्याने पिकवला काळा गहू; साधा गहू अन् यात काय आहे फरक? पुणे-बंगळुरू महामार्गापासून दोन किलोमीटर अंतरावर शिवपुरीनजीक बिरोबा डोंगराच्या पायथ्याशी विनायक पाटील यांची पाच एकर खडकाळ शेती आहे. त्यांनी यात ऊस हे नगदी पीक घेतले आहे. दीडशेहून अधिक आंब्याची झाडे त्याचबरोबर फणस, रामफळ, सीताफळ, पेरू, आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी, चिक्कू ड्रॅगन फूड, केळी, फणस अशा फळझाडांची लागवड केली आहे. तसेच लवंग, दालचिनीही लावली आहे. वेळेवर पाणी आणि खते देऊन या रोपांचे संगोपन केले आहे. प्रयोगाची परिसरात चर्चा विनायक पाटील यांनी केलेली शेती पाहण्यासाठी दुसऱ्या गावातील शेतकरी त्यांच्या बांधावर येत असतात. कराड सातारा सांगली इस्लामपूर या भागातील शेतकरी या ठिकाणी येत असतात. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांचीही हे शेत पाहण्यासाठी सहल येते. विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी म्हणून त्यांना वेगवेगळी माहिती देखील दिली जाते. सिताफळाचे भाव पडले म्हणून शेतकऱ्यानं शोधला नवा उद्योग,आता करतोय लाखोंची कमाई, Video ‘मला शेतीध्ये नवे प्रयोग करण्याची आवड आहे. यापूर्वी गायी आणि म्हशीचे पालन करण्याचा व्यवसाय केला होता. हा व्यवसाय यशस्वी झाली आहे. त्यानंतर फळबाग करण्याचा निर्णय घेतला. अनेक मित्रांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त झाड भेट दिले आहे.  उसाबरोबरच शेतकयांनी शेताच्या बांधावर आणि पडीक जमिनीत वृक्ष लागवड करून शेती सुजलाम् सुफलाम् करावी आणि पर्यावरणाचे रक्षण करावं, असं आवाहन पाटील यांनी केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या