अनुराग सुतकर, प्रतिनिधी
सोलापूर, 29 मार्च : मोठ्या कष्टानं लावलेल्या झाडांना सिताफळं लागली आणि बाजारात त्याचे भाव कोसळले. हा खरं तर कोणत्याही शेतकऱ्यासाठी निराशेचा आणि कसोटीचा क्षण असतो. पण, सोलापूरच्या दाम्पत्यानं या प्रसंगातही धीर सोडला नाही.त्यांनी मोठ्या जिद्दीनं आणि अभ्यासपूर्वक नवा मार्ग निवडला. या शेतकरी दाम्पत्यानं आता सीताफळाचा स्वत:चा ब्रँड बनववलाय. सीताफळ उद्योगातील 'राजा-राणी' बनलेल्या या शेतकरी दाम्पत्याची रबडी आज सोलापूरमध्ये चांगलीच फेमस आहे.
राजकुमार अतकरे आणि राणी अतकरे यांची ही भरारी प्रत्येक शेतकऱ्याला प्रेरणा देणारी आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी शेतामध्ये एक कोटी लिटर क्षमतेचं शेततळे खोदले. पाण्याची सोय झाल्यावर त्यांनी सेंद्रीय पद्धतीनं पेरू, सीताफळ, आंबा, चिकू, नारळ या फळांची लागवड केली. मागच्या वर्षी सिताफळाला 150 रुपये भाव मिळाला. पण, यावर्षी त्यांना व्यापाऱ्यांनी 30 रुपये भाव सांगितला.
सेंद्रीय पद्धतीची कमाल, सोलापूरच्या शेतकऱ्यानं घेतलं गव्हाचं विक्रमी उत्पादन, Video
मोठ्या कष्टानं लावलेली सिताफळं कमी भावात विकायची नाहीत, असं त्यांनी ठरवलं. त्यानंतर सिताफळाचा प्लप करण्याबाबत त्यांनी मोहळमधील कृषी केंद्रात प्रशिक्षण घेतले. येथील शास्त्रज्ञ दिनेश क्षीरसागर यांच्याशी चर्चा करुन प्लप तयार केला. त्यासाठी सर्व यंत्रसामृग्री खरेदी केली. त्यांनी बनवलेला अस्सल प्लपचा आणखी काय कशामध्ये वापर करता येईल याचा विचार करत असतानाच त्यांनी सिताफळ रबडी करण्याचे ठरवले.
पहिलीच कल्पना सुपरहिट
सिताफळ रबडी बनवण्याची प्रक्रिया समजून घेतल्यानंतर राजकुमार यांनी त्यांची पत्नी राणी अतकरे यांच्या मदतीनं हा उद्योग सुरू केला. राजकुमार हे डाकसेवक असल्यानं त्यांनी नागरिकांमध्ये नमुना म्हणून 25 किलो सिताफळ रबडी वितरित केली. त्यांची ही कल्पना सुपरहिट झाली. त्यांना अभिप्रायासोबतच चक्क 70 किलोची ऑर्डरच मिळाली. सोलापूरच्या गड्डा यात्रेतही त्यांच्या स्टॉलला जोरदार प्रतिसाद मिळाला. तब्बल तीन लाखांच्या सिताफळ रबडीची विक्री झाली. त्यामुळे त्यांनी बी फार्मचे शिक्षण घेऊन पुण्यात नोकरी करणाऱ्या मुलाला हा व्यवसाय करण्यासाठी बोलावून घेतले.
Video : सोलापूर जिल्ह्यातील सर्वात फेमस भेळ, एकाच प्लेटमध्ये भरतं पोट!
राजा-राणी ब्रँड
राजकुमार यांनी मुलगा रोहनच्या मदतीनं सातरस्त्यावर राजा-राणी कस्टर्ड अॅपल विक्री केंद्र सुरू केले. त्यामध्ये सिताफळ रबडीसह सिताफळ बासुंदी, सिताफळ आईस्क्रीम कुल्फी, केक या पदार्थांची त्यांनी विक्री सुरू केली. त्याचबरोबर अंजीर रबडी, मँगो बर्फीसह प्रत्येक सिझननुसार खास पदार्थांची विक्री ते करतात. ग्राहकांना वर्षभर अस्सल चवीच्या फळांची विक्री केल्यानं त्यांच्या राजा-राणी ब्रँडनं या उद्योगात स्वत:चा ठसा उमटवला आहे.
काही प्रमुख वैशिष्ट्य
-फळबागेतील सिताफळासह सर्व फळाची प्रक्रिया उत्पादने
- सिताफळ रबडी, बासुंदी, आइस्क्रीम, कुल्फीची निर्मिती
-सेंद्रीय पध्दतीने उत्पादीत फळांवर प्रक्रिया
-इतरांना रोजगार देत प्रक्रियेतून मिळवला फळांना रास्त भाव .
-सरकारी मदत न घेता केली उद्योगाची उभारणी
गूगल मॅपवरून साभार
अधिक माहितीसाठी संपर्क
रोहन अतकरे : +91 74981 63581
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Local18, Solapur, Success story