JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / panvel news : शाळेत जात असताना वाईट घडलं, मुख्याध्यापिका ओंबळेंचा मृतदेह पाहून सगळेच हळहळले

panvel news : शाळेत जात असताना वाईट घडलं, मुख्याध्यापिका ओंबळेंचा मृतदेह पाहून सगळेच हळहळले

ललिता ओंबळे ह्या घरातून आपल्या स्कुटीने नेहमीप्रमाणे जिल्हा परिषद शाळा गिरवले इथं जात होत्या. मात्र अचानक भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनाने

जाहिरात

(पनवेलमध्ये अपघात)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रमोद पाटील, प्रतिनिधी पनवेल, 24 जून : उन्हाळ्याच्या सुट्यानंतर आता शाळांना सुरुवात झाली आहे. पण पनवेलमध्ये मनाला चटका लावून जाणारी घटना घडली आहे. शाळेत जात असताना एका अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिकेचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पनवेलमधील मुंबई गोवा महामार्गावर पळस्पे ते पेण येथे जाणाऱ्या दिशेने पळस्पे गावजवळ ही घटना घडली आहे. ललिता ओंबळे असं मुख्याध्यापिकेचं नाव आहे. गिरवले येथील शाळेच्या ललिता ओंबळे या मुख्याध्यापिका होत्या. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ललिता ओंबळे ह्या घरातून आपल्या स्कुटीने नेहमीप्रमाणे जिल्हा परिषद शाळा गिरवले इथं जात होत्या. मात्र अचानक भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या स्कुटीला पाठीमागून ठोकर दिली. त्यामुळे त्यांचं नियंत्रण सुटलं आणि त्या खाली पडल्या. भरधाव गाडीचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेलं त्यामुळे जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक वाहन घेऊन पसार झाला आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. शाळा सुरू झाली असताना मुख्याध्यापिका ललिता ओंबळे यांचं अपघाती निधन झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. दौंड-पाटस मार्गावर भीषण अपघातात एकाचा मृत्यू दरम्यान, पुण्यातील पाटस दौंड रोडवर भीषण अपघात झाला असून अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. तर मर्सिडीज कारमधील एक जण जखमी झाला आहे. दरम्यान या अपघातात गावामधील दुचाकीस्वार मृत्यूचा झाल्याने बिरोबावाडी मधील संतप्त गावकऱ्यांनी मर्सिडीज कार पेटवून दिली. त्यामुळे काही काळ अष्टविनायक मार्गावरील दौंड पाटस वाहतूक थांबविण्यात आली होती. या अपघातमध्ये दुचाकी चालक नेहाल अप्पा गावडे यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वी मृत्यू झाला. तर कारमधील चालक जखमी असून त्यांना खाजगी रुग्णालयात केले आहे. पाटस पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या