मुंबई, 26 सप्टेंबर: संपूर्ण देशात आता कोरोनाचं उद्रेक वाढला आहे. कोरोनाबाधित रूग्णांची संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. दररोज 80 ते 90 हजार नव्या रूग्णांची भर पडत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारनं देशात लॉकडाऊनचा निर्णय घेतला. मात्र, या लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. हेही वाचा… ‘ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है’, भाजप आमदाराच्या विधानाने खळबळ देशासमोर कोरोनामुळे अनेक नवीन आर्थिक समस्या झाल्या. तरी मोदी सरकार केवळ बुडणाऱ्या जहाजाची छिंद्रं बुजवताना दिसत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते, आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहित पवार म्हणाले, देशावर अचानक आलेल्या कोरोना संकटात मोदी सरकारनं अर्थव्यवस्थेसंदर्भात सक्रिय धोरण स्वीकारण्याची गरज आहे. देशावर कोरोनाचा दीर्घकाळ परिणाम दिसेल, अशी शक्यताही रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये व्यक्त केली आहे. ‘कोरोनाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन प्रभाव असणार आहे. त्यामुळे अर्थव्यस्थेला पुर्नजीवन करण्यासाठी शाश्वत सक्रिय धोरण आखण्याची गरज आहे. दुर्दैवानं केंद्र सरकार केवळ बुडणाऱ्या जहाजाची छिंद्रं बुजवतानाच दिसत आहे. यात अनुभवाचा अभाव स्पष्टपणे दिसत आहे,’ असं रोहित पवार आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
केंद्रानं परिणामकारण धोरण आखावं देशावर कोरोनाचा दीर्घकाळ परिणाम दिसणार आहे. आताच देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारनं पावलं उचलण्याची मागणी राजकीय पक्षांसह विविध घटकांकडून केली जात आहे. रोहित पवार यांनी करोनाचे दीर्घ आर्थिक परिणाम होणार असल्याची शक्यता व्यक्त करतानाच केंद्रानं परिणामकारण धोरण आखण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. हेही वाचा… अजित पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानासमोर मराठ्यांनी वाजवला ढोल 24 तासांमध्ये 416 जणांचा मृत्यू दुसरीकडे, देशात कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक हा महाराष्ट्रात आहे. त्यातल्या त्यात मुंबईतत कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण पुन्हा वाढलं आहे. शुक्रवारी 19 हजार 592 रुग्ण बरे झाले. तर 17 हजार 794 नवे रुग्ण आढलले आहेत. तर मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झालेली नसून शुक्रवारी 416 जणांचा मृत्यू झाला. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 76 टक्यावर गेलं आहे.