JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ठाण्यात राष्ट्रवादीला दुसरा मोठा धक्का; बड्या नेत्याचा शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

ठाण्यात राष्ट्रवादीला दुसरा मोठा धक्का; बड्या नेत्याचा शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

ठाण्यात राष्ट्रवादीला गळती सुरूच आहे. शिंदे गटापाठोपाठ आता भाजपने देखील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 12 फेब्रुवारी, सुनिल घरत :  ठाण्यात राष्ट्रवादीला गळती सुरूच आहे. शिंदे गटापाठोपाठ आता भाजपने देखील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दशरथ तिवरे यांनी शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये दशरथ तिवरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे ठाण्यातील राष्ट्रवादीचे चार माजी नगरसेवक हे आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. शरद पवारांचे निकटवर्तीय  केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या पुढाकराने दशरथ तिवरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर येत आहे. दशरथ तिवरे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. मात्र त्यांनीच आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानं हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य, टीडीसी बँक अध्यक्ष, जिल्हापरिषद सदस्य , जिल्हा परिषद कृषी सभापती, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, मुंबई बँकेचे संचालक, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष, आणि आता महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवण्यात आल्या होत्या.

गेल्या अनेक दिवसांपासून पक्ष प्रवेशाची चर्चा   गेल्या चार वर्षंपासून ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर त्यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह नाशिकमध्ये भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची देखील उपस्थिती होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या