आता शिंदे गटाचं 'मिशन राष्ट्रवादी'
शिंदे गटात ठाकरे गटाकडून जोरदार इनकमिंग सुरू आहे.
नाशिक आणि ठाण्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी मोठ्याप्रमाणात शिंदे गटात सामील झाले आहेत.
मात्र आता शिंदे गटाने आपला मोर्चा राष्ट्रवादीकडे वळवल्याचं पहायला मिळत आहे.
ठाण्यात राष्ट्रवादीला गळती सुरू झाली आहे, अनेक नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर आहेत.
ठाण्यात शिंदे गटाने राष्ट्रवादीला खिंडार पाडलं आहे. चार नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
एवढंच नव्हे तर राष्ट्रवादीचे आणखी पाच नगरसेवक हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शिंदे गटाचं बॅनर झळकवलं असून, त्यावरून जितेंद्र आव्हाड यांचा फोटो गायब आहे.
आव्हाडांचे विश्वासू नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवरून देखील राजकारण चांगलंच तापलं होतं
माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांची शिंदे गटासोबत जवळीक वाढताना दिसून येत आहे.