JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Ajit Pawar : धाराशिव जावईबापूंच्याच बाजूने; सासरवाडीत झळकले दादांचे पोस्टर

Ajit Pawar : धाराशिव जावईबापूंच्याच बाजूने; सासरवाडीत झळकले दादांचे पोस्टर

Ajit Pawar : अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मागे उभा राहतील, असा अंदाज बांधण्यात आला होता.

जाहिरात

अजित पवार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बालाजी निरफळ/धाराशिव, 6 जुलै : धाराशिव राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाराशिव शहरात अभिनंदनचे बॅनर झळकले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील तेर गाव हे अजित पवारांची सासरवाडी असून माजी मंत्री व सद्या भाजपवासी डॉ. पदमसिंह पाटील हे त्यांचे मेहुणे आहेत. धाराशिव जिल्ह्यावर अजित पवारांचे पहिल्यापासूनच वर्चस्व राहिले आहे. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मागे उभा राहतील, असा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र आतापर्यंत जिल्ह्यात कोणत्याही राष्ट्रवादीच्या नेत्याने उघडपणे अजित पवार की शरद पवार याबाबत भूमिका जाहीर केलेली नाही. त्यातच आता धाराशिव शहरात अजित पवार यांचे अभिनंदन करणारे पोस्टर झळकले असून अजित पवार यांच्यासह शरद पवार यांचाही फोटो त्या बॅनरवर लावण्यात आला आहे. हे बॅनर कोणत्या नेत्यांनी लावले आहे हे मात्र स्पष्ट झालेले नाही. अजित पवारांकडे किती आमदार? राष्ट्रवादीतील बंडानंतर बुधवारी दोन्ही गटांच्या वतीनं शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. शरद पवार आणि अजित पवारांच्या गटाच्या वतीनं बैठका घेत आमदार आणि लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, यात अजित पवारांची सरशी झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण, अजित पवार गटाला बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा मिळाल्याचं समोर आलंय. Eknath Shinde : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत’, शिवसेनेकडून आली पहिली रिएक्शन राष्ट्रवादीतील फुटीनंतर राष्ट्रवादीचे आमदार कुणासोबत? याचा संभ्रम निर्माण झाला, याची पहिली चाचपणी बुधवारच्या दोन्ही गटाच्या बैठकांमधून करण्यात आली. ज्यात राष्ट्रवादीच्या 40 हून जास्त आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या आमदारांमध्ये 42 आमदार हे विधानसभेचे आहेत, तर 2 आमदार विधान परिषदेचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सर्व आमदारांनी अजित पवार यांच्या समर्थनाचं प्रतिज्ञापत्र दिले आहे. विशेष म्हणजे बुधवारच्या बैठकीतही अजित पवार गटाच्या वतीनं जोरदार शक्तिप्रदर्शन करत, सर्वाधिक आमदार आपल्याच सोबत असल्याचा दावा करण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या