मुंबई, 5 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर अजित पवार शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये दाखल झाले. राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. एवढच नाही तर आपल्याला 40 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार यांच्याकडून केला जात आहे. अजित पवार सत्तेत दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर निशाणा साधण्यात येत आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता राजीनामा द्यावा लागेल, असंही ठाकरे गटाकडून बोललं गेलं. ठाकरे गटाकडून करण्यात येत असलेल्या या दाव्यावर शिवसेनेकडून पलटवार करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची बातमी कोण पोहोचवतं माहिती नाही, ज्यांच्या पक्षात कुणी नाही ते अशा बातम्या देतात. ते राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, असं दिवास्वप्न कोणी पाहू नये, असा टोला उदय सामंत यांनी लगावला आहे. अजितदादांसोबत राष्ट्रवादीचे नेमके किती आमदार? फायनल लिस्ट आली समोर ‘पुढची आमदारकीची, लोकसभेची निवडणूक महायुती एकत्र लढवणार आहे. अजित पवार युतीत सामील झाल्याने आमचा एकही आमदार नाराज नाही, कोणतीही नाराजी नाही, यावर बैठकीमध्ये चर्चा झाली नाही. 2024 ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होतील हे यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे,’ असंही उदय सामंत यांनी सांगितलं. शिवसेना नेते शंभुराज देसाई यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री राजीनामा देणार नाहीत, पक्षात कुणी उरलं नाही ते अशा बातम्या पसरवतात, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अजित पवारांच्या येण्याने आमचा कोणताही आमदार नाराज नाही, मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. अजित पवार शिंदेंच्या एक पाऊल पुढे, शपथविधीआधीच केला करेक्ट कार्यक्रम!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.