JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'केंद्र सरकार म्हणतंय गाईला मिठी मारा, पण लाथ मारली तर..' अजित पवारांचा सवाल, म्हणाले..

'केंद्र सरकार म्हणतंय गाईला मिठी मारा, पण लाथ मारली तर..' अजित पवारांचा सवाल, म्हणाले..

Cow Hug Day: केंद्र सरकारच्या पशू कल्याण बोर्डाने काऊ हग डे साजरा करण्याचं आवाहन केलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी टीका केली आहे.

जाहिरात

काऊ हग डे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हिंगोली, 10 फेब्रुवारी : येत्या 14 फेब्रुवारीला एकीकडे व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची तयारी सुरु असताना केंद्र सरकारच्या पशू कल्याण बोर्डाने काऊ हग डे साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. 14 फेब्रुवारीला गायींना अलिंगन द्या, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करा, असं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे. दरम्यान यानंतर सर्व स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी या निर्णयावर टीका करत सरकारला टोला लगावला आहे. अजित पवार हे हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते. काय म्हणाले अजित पवार? “केंद्र सरकारच्या पशू कल्याण बोर्ड म्हणतेय की ‘काऊ हग डे’ साजरा करायचा म्हणजे गाईला मिठी मारायची, असा निर्णय काढणाऱ्या या पशू कल्याण बोर्डाचं डोकं ठिकाणावर आहे का? असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या निर्णयावर टीका केली आहे. आपण गाईला गोंजारतो, चारा टाकतो पण हे बोर्ड गाईला मिठी मारायला लावत आहे. गाईला मिठी मारताना गाईने शिंगाने फेकून दिलं किंवा लाथ मारली तर मग कसं करायचं असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. अजित पवार हे हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते. वाचा - राष्ट्रवादीचे आमदार सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात! अश्लील व्हिडीओ बनवून मागितली खंडणी केंद्र सरकारने काय सूचना केली आहे? केंद्र सरकारच्या पशू कल्याण बोर्डाने काऊ हग डे साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. 14 फेब्रुवारीला काऊ हग डे साजरा करा अशी सूचना केंद्राने केली आहे. गायींना अलिंगन द्या. तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करा, असं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावरून शिवसेनेनेही भाजपची खिल्ली उडवली आहे.

संबंधित बातम्या

जितेंद्र आव्हाड यांचीही टीका जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला असून यामध्ये गाय नकार देत असतानाही तिला मिठी मारण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. काऊ हग डेसाठी हा सराव सुरू असल्याचं उपहासात्मकपणे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. दरम्यान गायीला नेमकी मिठी कशी मारायची? कुठून मारायची? हे शासनाने सांगावं, असा खोचक सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. गायीला मिठी कशी मारायची याचं प्रात्यक्षिक सरकारने 24 तास आधी टीव्हीवर दाखवावं असं ते म्हणाले आहेत. गाईवर प्रेम करण्यास काही हरकत नाही. पण गायी आणायच्या कुठून? सरकार गायी उपलब्ध करून देणार आहे का? अशी विचारणाही जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या