नाशिक जिल्ह्यातील लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात घडला आहे.
लासलगाव, 13 फेब्रुवारी : नाशिक जिल्ह्यातील लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात घडला आहे. टॉवर वॅगेन ट्रेनने चार कर्मचाऱ्यांना उडवलं. या अपघातात 4 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जण 1 गंभीर जखमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे 5.44 वा दरम्यान लासलगाव -उगाव रेल्वे स्टेशन दरम्यान ही घटना घडली आहे. ठार झाले सर्व कामगार गँगमन होते. टॉवर (लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन) रॉग डायव्हरशने लासलगाव बाजूने उगावकडे जात होते. पोल नंबर 15 ते 17 मधी ट्रॅक मेंटन (ब्लॉक तयारी) करण्याचे काम सुरू होते. (mumbai malad fire : एकापाठोपाठ 15 सिलेंडर फुटले, पत्रा मानेतच घुसला, 14 वर्षांचा मुलगा जिवाशी गेला, VIDEO) हे काम खालील ट्रक मेंटेनर कर्मचारी काम करत होते. त्याचवेळी अचानक रेल्वे लाईनची मेंटनेस करणारे टॅावरने धडक दिली. अपघातात जबर मार लागण्याने 4 जणांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची नावं 1) संतोष भाऊराव केदारे वय 38 वर्षे 2) दिनेश सहादु दराडे वय 35 वर्षे 3) कृष्णा आत्मराम अहिरे वय 40 वर्षे 4) संतोष सुखदेव शिरसाठ वय 38 वर्षे सोलापूरमध्ये वृद्ध दाम्पत्याचा झोपडीत होरपळून मृत्यू दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये ह्रदय पिळवून टाकणारी घटना घडली आहे. पाणी तापवण्यासाठी पेटवलेल्या चुलीची ठिणगी पडून खोपटीला लागलेल्या आगीत दोन वृद्ध पती-पत्नी जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. भिमराव काशिराम पवार, कमल भिमराव पवार अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. (कर्जामुळे दुकान बंद झाले, नैराश्य आल्याने उचललं भयानक पाऊल, जळगावात खळबळ) गाडेगाव येथील पवार वस्तीवर भीमराव काशीराम पवार, कमल भीमराव पवार यांच्यासह नातू प्रथमेश हे तिघेजणी खोपटी करून राहत होते. आज साडेसहा वाजेच्या सुमारास चुलीवर पाणी ठेवण्यासाठी कमलबाई उठून चुल पेटवून पाणी ठेवलं. त्यांच्या जवळील नातू प्रथमेश ला म्हैस सुटल्यामुळे बांधण्यासाठी उठवलं होतं. मात्र त्याच वेळी चुलीतील आग खोपटीच्या दिशेने वारे वाहू लागल्यामुळे खोपटीला आग लागली दोघांनी विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने उग्ररूप धारण केलं. त्यावेळी पत्नी कमलबाई आपला पती आत झोपलेला असल्यामुळे त्याला उठवण्यासाठी गेले. पण तोपर्यंत आगीने रौद्ररुपधारण केले होते. त्यामुळे दोघेही आतमध्ये अडकले गेले. त्यामुळे दोघेही जागीच मृत पावल्याची घटना घडली आहे.