नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 13 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या, तसेच आर्थिक फसवणुकीच्याही घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता जळगाव जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव शहरातील सिंधी कॉलनीत राहणाऱ्या एका प्रौढाने कर्जामुळे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. सुभाष कुंदनमल लुंड असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सुभाष लुंड हे पत्नी राणीबाई लुंड यांच्यासह वास्तव्याला होते. सिंधी कॉलनीत केकचे दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कर्जबाजारीमुळे त्यांचे दुकान बंद होते. त्यामुळे काही दिवसांपासून तणावात होते. रात्री ते जेवण करून झोपले होते. मध्यरात्री त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांची पत्नी राणीबाई या सकाळी झोपेतून उठल्यावर हा प्रकार लक्षात आला. हेही वाचा - समलैंगिक ॲपवरून ओळख, IITच्या विद्यार्थ्यासोबत लैंगिक अत्याचार, तंत्रविद्येचाही वापर, मुंबईतील हादरवणारी घटना अन् पत्नीने हंबरडा फोडला - पतीने आत्महत्या केल्याचे पाहताच, पत्नीने हंबरडा फोडला. त्यांच्या आवाजाने शेजाऱ्यांनी मोठी गर्दी केली. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या मदतीने त्यांना खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सातपुते यांनी मृत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.