JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुलाच्या समोरच आईने मारली विहिरीत उडी; चिमुकल्याने आईला वाचवण्यासाठी फोडला हंबरडा

मुलाच्या समोरच आईने मारली विहिरीत उडी; चिमुकल्याने आईला वाचवण्यासाठी फोडला हंबरडा

नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यात एक धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. आजार आणि कर्जाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नांदेड, 29 मार्च : नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यात एक धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. आजार आणि कर्जाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 30 वर्षीय महिलेने आपल्या 13 वर्षीय मुलासमोरच हे टोकाचं पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मीनाबाई पंजाबराव मेने (वय 30) असे या महिलेचे नाव आहे.

हदगांव तालुक्यातील चक्री या गावात राहणाऱ्या मीनाबाई मागच्या काही काळापासून आजारी होत्या. सततचा आजार आणि डोक्यावर असलेले कर्ज यामुळे त्या निराश झाल्या होत्या. आपल्याला आलेला आजार आणि त्यातच डोक्यावर कर्ज असल्याने त्यांना याच मानसिक त्रास व्हायचा.  

मला IPS व्हायचं होतं, ताईला घेऊन जा मी चालले, 13 वर्षांच्या मुलीने संपवलं आयुष्य, बीड हळहळलं

संबंधित बातम्या

दरम्यान मागच्या दोन दिवसांपूर्वी (दि.26) रविवारी दुपारी मीनाबाई आपल्या 13 वर्षांच्या शिवम नामक मुलाला सोबत घेऊन शेताकडे गेल्या. त्यानंतर मुलाला झाडाखाली बस मी लगेच येते, असं म्हणत त्या तिथून निघून गेल्या आणि विहीरीमध्ये थेट उडी घेतली. आई का पळते म्हणून मुलगा देखील तिच्या पाठीमागे पळू लागला. शेताच्या काही अंतरावर असलेल्या विहरीत जवळ त्या थांबल्या आणि आपल्या मुलाकडे पाहून त्यांनी विहरीत उडी मारली.

आपल्या आईला विहरीत बुडताना पाहून त्या चिमुकल्या मुलाने आरडाओरडा देखील केली. मात्र, तिथे कोणीच नसल्याने अखेर तो मुलगा धावत पळत गावात गेला आणि आपल्या वडिलांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर गावकरी घटनास्थळी पोहचले आणि पोलिसांच्या मदतीने त्या महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.  

ऑनलाईन टॉवेल ऑर्डर करताच महिलेच्या अकाऊंटमधून 8 लाख गायब; तुम्ही ‘ही’ चूक करत नाही ना?
जाहिरात

मयत महिलेच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि पती असा परिवार आहे. चिमुकल्या मुलांच्या टाहोने गावकऱ्यांचे हृदय हेलावून गेले होते. दरम्यान, या प्रकरणी हदगांव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेनं चक्री गावात शोककळा पसरली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या